शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

मंगरूळच्या निवारागृहात ८४ मजुरांची व्यवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2020 23:01 IST

चांदवड (महेश गुजराथी) : कोरोना विषाणू अर्थात कोविड -१९ ची चाहूल देशभरात मार्च महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात लागताच सर्वत्र देशभर शासकीय, प्रशासकीय यंत्रणा सतर्क झाली.

चांदवड (महेश गुजराथी) : कोरोना विषाणू अर्थात कोविड -१९ ची चाहूल देशभरात मार्च महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात लागताच सर्वत्र देशभर शासकीय, प्रशासकीय यंत्रणा सतर्क झाली. त्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यासह चांदवड तालुक्यातील महसूल, प्रशासकीय, पोलीस यंत्रणेनेदेखील सर्वच जय्यत तयारी करून ठेवली होती. त्यात कोरोेनाच्या पार्श्वभूमीवर स्थलांतरित मजुरांसाठी निवारागृह व क्वॉरण्टाइन कक्ष उभारण्यात आले. चांदवड तालुक्यातील मंगरूळ येथील सामाजिक कार्यकर्ते विजय पुंजाराम जाधव यांच्यारेणुका इव्हेंट हॉलमध्ये अशा प्रकारची सुविधा करून ठेवली आहे.पुणे व मुंबई येथून निघालेल्या ८४ मजुरांना दि. १५ एप्रिल रोजी मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास मालेगाव हद्दीत पोलिसांनी अडविले. हे मजुर काही दुचाकी, काही चारचाकी वाहनाने उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश येथे जात असल्याने त्यांची वैद्यकीय तपासणी करून जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी त्यांना चांदवड तालुक्यातील मंगरूळ येथील रेणुका इव्हेंट हॉलमधील क्वॉरण्टाइन कक्षात ठेवले. त्या दिवसापासून आतापर्यंत (दि. ४ मेपर्यंत) या मजुरांना येथेच ठेवण्यात आले आहे. त्यांची मंगरुळ येथील तेजबहादूर गुरुद्वारा प्रबंध समितीच्या लंगरमार्फत सुखीसिंग, गोगीसिंग, सुरजितसिंग सैनी, बलदेवसिंग रॉय, रवी मंजाल, बुटासिंग व शीख बांधव यांनी एक वेळ नास्ता, चहा, दोन वेळचे जेवण अशी व्यवस्था केली आहे. गुरुद्वारा प्रबंध समितीने या ८४ मजुरांव्यतिरिक्त रस्त्याने पायी जाणाऱ्या लोकांना अन्न, पाणी, चहा, नास्ता उपलब्ध करून दिला आहे.याशिवाय लोकसहभागातून चांदवड येथील व्यवहारे वस्रालयाचे दीपक दत्तात्रय व्यवहारे यांनी त्यांच्या फाउण्डेशनच्या वतीने या मजुरांना अंर्तवस्त्रे उपलब्ध करून दिली, तर हिरा नगिना यांच्या वतीने साबण, टुथपेस्ट आदी साहित्य देण्यात आले. अनेक संस्थांनी जीवनावश्यक साहित्य दिले. मंगरूळच्या सरपंच रेखा ढोमसे यांनी गुरुद्वारा समितीला गहू सुपुर्द केला.-----------चांदवड तालुक्यातील मंगरूळ येथील निवारागृहात आमची जेवण, नास्ता, चहा व राहण्याची व्यवस्था अगदी घरच्यासारखी झाली. त्यामुळे आम्हाला घर अथवा पळून जाण्याची आठवणच आली नाही. आम्ही पुणे येथे मजुरी करुन काम करीत होतो. मात्र सर्व अधिकाऱ्यांनी चांगली व्यवस्था ठेवली.- रामरूप कन्नोजिया, ता. भानपूर, जि. बस्ती, उत्तर प्रदेश--------------------चांदवड तालुक्यातील रेणुका इव्हेंट हॉल येथे आमच्या राहण्याबरोबरच आम्हाला साबण, पेस्ट व जीवनावश्यक वस्तू मिळाल्याने महाराष्टÑातील जनता धन्यवादास पात्र आहे. आम्ही सूतारकाम, पीओपी रंग काम करणारे असून, गावी जात होतो.- राजेंद्र कुमार यादवभाननपूर जि. बस्ती, उत्तर प्रदेश

टॅग्स :Nashikनाशिक