नाशिक : दिंडोरी व नाशिक लोकसभा मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार हरिश्चंद्र चव्हाण व शिवसेनेचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्या विजयानंतर सर्वत्र जल्लोष सुरू असतानाच, निकालानंतर अवघ्या एका तासातच शहराच्या चौकाचौकांत विजयी उमेदवारांच्या अभिनंदनाचे फ लक झळकण्यास प्रारंभ झाला़ निवडणुकीचे निकाल सुरू झाल्यानंतर या दोन्ही उमेदवारांनी आघाडी घेतल्यानंतर शहरात जल्लोषपूर्ण वातावरण निर्माण झाले होते़ निवडणुकीची मतमोजणी अडीच वाजेदरम्यान पूर्ण होऊन गोडसे व चव्हाण यांच्या विजयावर शिक्कामोर्तब झाले़ काही क्षणात एसएमएस, व्हॉट्स ॲपवर काही वेळातच निकाल सगळीकडे पोहचला़ यासह भाजपा-शिवसेनेच्या पदाधिकार्यांनी अभिनंदनाचे एसएमएसही टाकले़ परंतु सुनसान असलेल्या चौकांमध्ये निकाल जाहीर झाल्यांतर एक तासाच्या आतच या उमेदवारांच्या अभिनंदनाचे तसेच जनतेच्या आभाराचे फ लक भाजपाच्या उद्योग आघाडीच्या वतीने लावण्यात आले़ यानंतर पार्टी व संघटना तसेच पदाधिकार्यांनी फ लक उभारण्यास प्रारंभ केला़ सायंकाळपर्यंत सर्वच चौक मोठ्या प्रमाणावर या फ लकांनी भरले होते़
तासात झळकले अभिनंदनाचे फ लक
By admin | Updated: May 17, 2014 00:38 IST