शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

दिंडोरीच्या उमराळे गावात 150 ते 200 शेतकऱ्यांना विषबाधा, एका शेतक-याचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2017 22:31 IST

दिंडोरी तालुक्यातील उमराळे बुद्रुक येथे धात्रक वस्तीवर बायर सिड्स या कंपनीने टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांसाठी आयोजित चर्चासत्र कार्यक्रमात जेवणातून सुमारे 150 हून अधिक शेतकऱ्यांना विषबाधा झाली

दिंडोरी- तालुक्यातील उमराळे बुद्रुक येथे धात्रक वस्तीवर बायर सिड्स या कंपनीने टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांसाठी आयोजित चर्चासत्र कार्यक्रमात जेवणातून सुमारे 150 हून अधिक शेतकऱ्यांना विषबाधा झाली असून, एक जण मृत्युमुखी पडला आहे. तर इतरांवर नाशिक दिंडोरी येथे वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार सुरू आहे.

मिळालेली माहितीनुसार, उमराळे बुद्रुक येथे पेठ रोडलगत रमेश मनोहर धात्रक यांच्या वस्तीवर बायर सिड्स कंपनीने संकरित टोमॅटो पीक पाहणी व चर्चासत्र कार्यक्रम आयोजित केले होते. सदर चर्चासत्र दुपारी एक वाजता आटोपून त्यानंतर उपस्थित सुमारे 150 शेतकऱ्यांनी जेवण केले. त्यानंतर काही शेतकऱ्यांना मळमळ उलटीचा त्रास जाणवू लागल्याने त्यांना नातेवाईकांनी नाशिक येथे खासगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले. त्यातील अतुल केदार वय 41 याचे उपचारादरम्यान निधन झाले. दरम्यान या घटनेने सर्वत्र घबराट पसरली.रात्री नाशिक येथे जिल्हा रुग्णालयात 40 तर दिंडोरी येथील ग्रामीण रुग्णालयात 12 शेतकरी त्रास होऊ लागल्याने उपचारासाठी दाखल झाले. त्याचबरोबर दिंडोरी व नाशिक येथील विविध खासगी दवाखान्यात सुमारे 50 हुन अधिक रुग्ण दाखल झाले. सदर घटनेचे वृत्त समजताच आमदार नरहरी झिरवाळ माजी आमदार धनराज महाले यांनी शासकीय यंत्रणेला सूचना दिल्या. माजी आमदार धनराज महाले, प्रांताधिकारी उदय किसवे, तहसीलदार बाबासाहेब गाढवे, पाणीपुरवठा समिती सभापती कैलास मवाळ, माधवराव साळुंखे यांनी  रुग्णालयात रुग्णांची भेट घेऊन विचारपूस केली. ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, परिचारिका यांनी रुग्णांवर तातडीने उपचार केले. दिंडोरी येथे प्रमोद अपसुंदे रामचंद्र मेधने, रामू अपसुंदे, शांताराम अपसुंदे, राजेंद्र केदार, स्वप्नील केदार, राजेंद्र थेटे, निलेश नागरे, उत्तम केदार, अंकुश केदार, मंगेश कदम, बबलू गवारे आदींवर उपचार सुरू आहे. याबाबत दिंडोरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक शिरसाठ सहाय्यक पोलीस निरीक्षक पाडवी आदींनी तपास सुरू केला आहे.

>दिंडोरी पोलिस स्टेशन येथील उमराले बु!! तालुका दिंडोरी येथे आज 8.11.2017 रोजी दुपारी 12.00 ते 14.00 वाजता दरम्यान बायर कंपनी (पेस्टिसाइड) ची औषध विक्री बाबत शेतकरी मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित केला होता त्याकार्यक्रमात त्या ठिकाणी जेवनात विषबाधा झालेली असून खालील प्रमाणे रुग्ण उपचारासाठी दाखल आहेत.1)साईसिद्धि हॉस्पिटल दिंडोरी=062)श्रीरसागर हॉस्पिटल दिंडोरी=063)ओपोलो हॉस्पिटल नाशिक=204)यशवंत हॉस्पिटल नाशिक=155)सिविल हॉस्पिटल नाशिक=086)ग्रामीण रुग्णालय दिंडोरी=12असे एकूण 67 रुग्ण दाखल आहेत..!!त्यापैकी एक रुग्ण नामे अतुल पांडुरंग केदार वय 38 वर्षे राह.उमराले बु!! तालुका दिंडोरी जि.नाशिक हे मृत झालेले आहेत..!!कैटरिंग मालक सुनील पोपट वडजे वय 47 वर्षे राह.मड़कीजांब ता.दिंडोरी यांनी जेवण बनविण्याचे काम केले होते..!!