शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

सैन्याचे बनावट ओळखपत्र बाळगणारा अखेर गजाआड; सहा महिन्यानंतर उलगडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2019 22:41 IST

कॉम्बॅट आर्मी एव्हीएशनच्या(कॅटस्) प्रवेशद्वारावर तैनात असलेल्या फिर्यादी सुभेदार जयदेव जोशी यांच्याकडे १० डिसेंबर २०१८ रोजी आणून दिले होते. त्यानंतर सदरचे ओळखपत्र तपासणी करता त्यांनी वरिष्ठ अधिकारी कुमार मोहंती यांच्याकडे सोपविले.

ठळक मुद्देआठवडाभरात संशयित जाधव याचा छडाओळखपत्र उडीसातील लष्कराच्या ए.ए.डी केंद्राकडे तपासणीसाठी

नाशिक : वर्षभरापुर्वी एका अज्ञात जागरूक नागरिकाला गांधीनगर येथील ‘कॅटस्’च्या जवळ सैन्याचे ओळखपत्र, एटीएमकार्ड रस्त्यावर आढळून आले. त्याने तत्काळ हे दस्तऐवज कॅटस्च्या मुख्य प्रवेशद्वारावर तैनात जवानांकडे सोपविले. त्या जवानांनी ते ताब्यात घेऊन वरिष्ठांकडे दिले. ओळखपत्र चौकशीसाठी उडीसा येथे लष्कराच्या मुख्यालयाकडे पाठविण्यात आले. तेथे ओळखपत्र बनावट असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर देवळाली येथील लष्कराच्या गुप्तहेर अधिकाऱ्यांनी चौकशी करत ओळखपत्रावरील बनावट सैन्यअधिकारी संशयित नवनाथ युवराज जाधव (रा.कमलनगर, हिरावाडी) यास शिताफीने ताब्यात घेऊन त्याची चौकशी करत देवळाली कॅम्प पोलीसांच्या हवाली केले.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, कॉम्बॅट आर्मी एव्हीएशनच्या(कॅटस्) प्रवेशद्वारावर तैनात असलेल्या फिर्यादी सुभेदार जयदेव जोशी यांच्याकडे १० डिसेंबर २०१८ रोजी आणून दिले होते. त्यानंतर सदरचे ओळखपत्र तपासणी करता त्यांनी वरिष्ठ अधिकारी कुमार मोहंती यांच्याकडे सोपविले. त्यांनी हे ओळखपत्र व एटीएम कार्ड छाननीसाठी देवळाली मुख्यालयाकडे पाठविले तेथे ओळखपत्रावरील छायाचित्र इंग्रजी नाव तसेच लष्काराचे क्रमांक आदिबाबत पडताळणी करण्यात आली; मात्र त्यावरून फारसे स्पष्ट न झाल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ओळखपत्र उडीसा राज्यातील लष्कराच्या ए.ए.डी केंद्राकडे तपासणीसाठी रवाना केले. केंद्राने ओळखपत्रावरील क्रमांकासह आदि माहिती व इसमाच्या छायाचित्राअधारे तपास करून अशा नावाची व्यक्ती सैन्यदलात नसून असे कोणतेही ओळखपत्र केंद्राकडून दिले गेले नसल्याचे निष्पन्न केले. एटीएम कार्डावरून केंद्रातील गुप्तहेर अधिकारी-कर्मचा-यांनी संशयित व्यक्तीचा नाव, पत्ता आदि माहिती संकलित करून ही व्यक्ती बनावट ओळखपत्र बाळगणारी असल्याची खात्री पटवून देवळाली मुख्यालयाला माहिती कळविली. त्यानंतर सदन कमांडंट लायझन युनीट यांच्याकडे याप्रकरणाची चौकशी मागील महिन्यात दिली गेली. युनीटने याबाबतची जबाबदारी सुभेदार शशी कुमार, हवालदार धीरज सोनार यांच्याकडे गेल्या शनिवारी (दि.१८) सोपविली. या दोघा जवानांनी आठवडाभरात संशयित जाधव याचा छडा लावून शानिवारी (दि.२५) सापळा रचून मुसक्या आवळल्या.

त्याच्याविरूध्द सुभेदार जयदेव वाडीलाल जोशाी यांनी देवळाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीवरून पोलिसांनी भारत सरकारची फसवणूक केल्याचा गुन्हा जाधवविरूध्द दाखल केला आहे. त्यास पोलिसांनी रविवारी (दि.२६) न्यायालयापुढे हजर केले असता न्यायालयाने येत्या २७ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. पुढील तपास सहायक निरिक्षक वाल्मिक शार्दुल करीत आहेत.

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानArrestअटकNashikनाशिकPolice Stationपोलीस ठाणे