शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

सेना पदाधिकाऱ्याकडून भाजप आमदाराच्या कार्यालयात गोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2019 17:48 IST

आमदार सीमा हिरे यांच्या कार्यालयातील कर्मचा-याने त्या विद्यार्थ्याला तीन वेळा परत पाठविल्याने संतप्त राणे यांनी आमदारांच्या कार्यालयात जाऊन कर्मचा-यांना जाब विचारला असता,

ठळक मुद्देआमदार हिरे व राणे यांच्यात शाब्दिक चकमकही झाली.

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : आधार कार्ड काढण्यासाठी आमदारांचे शिफारस पत्र घेण्यासाठी गेलेल्या विद्यार्थ्यास आमदारांच्या संपर्क कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी नकार दिला. त्याचा जाब विचारण्यासाठी गेलेले शिवसेनेचे माजी पदाधिकारी सचिन राणे यांनी भाजपच्या आमदार सीमा हिरे यांच्या कार्यालयात गोंधळ घातला. दरम्यान यावेळी आमदार हिरे व राणे यांच्यात शाब्दिक चकमकही झाली.

एका विद्यार्थ्यास आधार कार्ड काढायचे होते. त्यासाठी रहिवासी पुरावा म्हणून आमदारांच्या दाखल्याची गरज होती. आमदार सीमा हिरे यांच्या कार्यालयातील कर्मचा-याने त्या विद्यार्थ्याला तीन वेळा परत पाठविल्याने संतप्त राणे यांनी आमदारांच्या कार्यालयात जाऊन कर्मचा-यांना जाब विचारला असता, आमदार हिरे यांच्या कार्यालयातून तसे पत्र देता येत नाही, असे सांगण्यात आले. त्यामुळे राणे यांचे कर्मचा-यांशी वाद सुरू असताना त्याचवेळी आमदार हिरे व भाजपा पदाधिकारी महेश हिरे यांनी बाहेर येऊन राणे यांना काय चालले याबाबत विचारणा केली असता, राणे यांनी घडलेला प्रकार सांगितला. राणे यांनी चढ्या आवाजात संभाषण केल्यामुळे आमदार हिरे व त्यांचे पती महेश हिरे यांनीही आवाज वाढविला. त्यामुळे काही काळ राजकीय तणाव निर्माण होऊन गर्दी झाल्यामुळे संतप्त राणे यांनी हिरे यांचे कार्यालय सोडून वादावर पडदा टाकला. 

 

टॅग्स :PoliticsराजकारणNashikनाशिक