शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

सेना-मनसे युती; नाशकात ‘कभी नही’

By admin | Updated: January 28, 2017 23:38 IST

सैनिकांची मानसिकता : शिवसेनेकडून स्वबळाचा नारा

नाशिक : भाजपाशी काडीमोड घेण्याची घोषणा शिवसेनेने केल्यानंतर आता सेना-मनसे युतीची चर्चा सुरू झाली असली तरी नाशिकमध्ये मात्र डुबत्या जहाजात बसण्याची शिवसेनेची मानसिकता दिसत नाही. शिवसैनिकांकडून स्वबळाचाच नारा दिला असताना दोन्ही ठाकरे जो निर्णय घेतील तो आम्हास बंधनकारक असल्याचे सेना-मनसेचे पदाधिकारी स्पष्ट करत आहेत. राज्यातील दहाही महापालिका आणि जिल्हा परिषद-पंचायत समित्यांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याची घोषणा प्रजासत्ताकदिनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आणि भाजपाशी काडीमोड घेतला. भाजपाशी फारकत घेतल्यानंतर आता शिवसेना-मनसे एकत्र येण्याची चर्चा सुरू झाली आहे. दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार काय, या चर्चेला उधाण आले आहे. मुंबईत सेनेची ताकद असल्याने मुंबई सेनेने घ्यावी आणि नाशिक मनसेला द्यावे, अशीही कंडी पिकविली जात आहे. सेना-मनसे युतीची चर्चा म्हणा अथवा अफवा, नाशिकमध्ये मात्र, शिवसैनिकांकडून या युतीवर फुली मारली जात आहे. भाजपाशी युती तोडल्याचा आनंदोत्सव शिवसैनिकांकडून साजरा केला जात असतानाच आता पुन्हा युतीचे झेंगाट नको, अशी मानसिकता शिवसैनिकांमध्ये दिसून येत आहे. त्यातच, नाशिकमध्ये गेल्या पाच वर्षांत शिवसेनेने सातत्याने मनसेला विरोध दर्शविला आहे. मनसेच्या नवनिर्माणाची खिल्ली उडवितानाच महापालिकेत सत्ताधारी मनसेला नेहमीच लक्ष्य केलेले आहे. मनसेची पुरती हवा गुल झालेली असल्याने या डुबत्या जहाजात कोण बसणार? असा सवालही सैनिक व्यक्त करत आहेत. मनसेच्या ४० नगरसेवकांपैकी २८ नगरसेवकांनी पक्ष सोडलेला आहे. त्यात सर्वाधिक १७ नगरसेवक हे शिवसेनेत गेले आहेत. सेनेमध्येच मोठ्या प्रमाणावर इच्छुक असताना मनसेशी युती करून सैनिकांची नाराजी ओढवून घेण्यासारखे असल्याची चर्चा सुरू आहे.  शिवसैनिकांची युतीबाबत मानसिकता नसताना मनसैनिकांमध्ये मात्र सावध पवित्रा घेतला जात आहे. सेना-मनसेची युती झाल्यास महापालिकेवर सत्ता नक्की असल्याचेही म्हटले जात आहे, तर काही मनसैनिकांकडून स्वबळाचीच भाषा ऐकविली जात आहे. (प्रतिनिधी)