शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
2
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
3
उद्धवसेनेचे माजी नगरसेवक मनसेशी युतीच्या बाजूने
4
इराणवर हल्ला करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची मंजुरी; 'या' कारणामुळे थांबवला अंतिम आदेश
5
Rishabh Pant, IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध विराट कोहलीच्या जागी कोण बॅटिंगला उतरणार? उपकर्णधार ऋषभ पंतने दिलं उत्तर
6
JM Mhatre: जे. एम. म्हात्रेंच्या ४४ कोटींच्या ठेवी, गुंतवणुकीवर ईडीची टाच
7
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर आज दिल्लीत होणार अंत्यसंस्कार, पण का झाला उशीर?
8
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
9
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
10
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
11
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
12
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
13
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
14
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
15
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
16
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
17
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
18
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
19
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
20
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा

नाशिकरोडला पोलिसांचे सशस्त्र संचलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2019 00:36 IST

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा-सुव्यवस्था अबाधित राहावी याकरिता नाशिकरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलीस प्रशासनाकडून सशस्त्र संचलन करण्यात आले.

नाशिकरोड : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा-सुव्यवस्था अबाधित राहावी याकरिता नाशिकरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलीस प्रशासनाकडून सशस्त्र संचलन करण्यात आले.लोकसभा निवडणुकीसाठी सोमवार (२९ एप्रिल) मतदान होणार असून या काळात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये. समाजकंटक व राजकीय पक्षाकडून वादविवाद, दहशत निर्माण होऊ नये, मतदान शांततेत, निर्भयपणे पार पडावे याकरिता पोलीस प्रशासन व शासकीय यंत्रणा सज्ज असल्याचे दाखविण्यासाठी गुरुवारी सायंकाळी नाशिकरोड परिसरात व संवेदनशील भागात संचलन करण्यात आले.नाशिकरोड पोलीस ठाण्यापासून सुरू झालेले संचलन शिवाजी पुतळा, आंबेडकर पुतळा, सुभाषरोड, मालधक्कारोड, सिन्नरफाटा परिसर, जेलरोड, शिवाजीनगर, पवारवाडी कॅनलरोड आदि भागात पोलीस प्रशासनाकडून संचलन करण्यात आले.  नाशिकरोडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नीलेश माईनकर, दुय्यम पोलीस निरीक्षक सुधीर डोंबरे यांच्यासह शीघ्रकृती दल, दंगा नियंत्रण पथक, सीआरपीएफचे जवान या सशस्त्र संचलनात सहभागी झाले होते.

टॅग्स :PoliceपोलिसLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक