सिन्नर: तालुक्यातील डुबेरे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी अर्जुन रामकृष्ण वाजे तीन मतांनी विजयी झाले, तर उपसरपंचपदी नंदा पवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी देसले यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठक पार पडली. ज्ञानेश्वर ढोली, रामनाथ पावसे, इंदुबाई वारूंगसे, सविता वारूंगसे, सागर वारूंगसे, सुवर्णा वारूंगसे, प्रतिभा वाजे, कल्पना ढोली आदी उपस्थित होते. सरपंचपदासाठी अर्ज दाखल करण्याच्या निर्धारित वेळेत अर्जुन वाजे, अनिल वारूंगसे यांनी उमेदवारी अर्ज सादर केले. दोन अर्ज दाखल झाल्याने निवडणूक घेण्यात आली. त्यात अर्जुन वाजे यांना सात, तर अनिल वारूंगसे यांना चार मते मिळाली. अर्जुन वाजे यांची तीन मतांनी सरपंचपदी निवड झाल्याचे देसले यांनी घोषित केले. उपसरपंचपदी नंदा पवार यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाला. त्यांची निवड बिनविरोध करण्यात आली. निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी तलाठी गांगुर्डे, ग्रामपंचायतीचे कर्मचारी नामदेव पावसे, अशोक वामने यांनी सहकार्य केले.
डुबेरेच्या सरपंचपदी निवड झाल्यानंतर जल्लोष करण्यात आला. यावेळी अर्जुन वाजे, ज्ञानेश्वर ढोली, कल्पना ढोली, इंदुबाई वारूंगसे, प्रतिभा वाजे आदी उपस्थित होते. (२६ डुबेरे)
===Photopath===
260221\26nsk_20_26022021_13.jpg
===Caption===
२६ डुबेरे