शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
5
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
6
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
7
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
8
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
9
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
10
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
11
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
12
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
13
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
14
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
15
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
16
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
17
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
18
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
19
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
20
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक जिल्ह्यात वाळूतस्करीला चाप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2018 15:23 IST

नाशिक जिल्ह्यातील नदीपात्रातील वाळूंचे ठिय्ये गेल्या तीन वर्षांपासून लिलावाविना पडून असून, सरकारच्या नवीन वाळू धोरणातील जाचक अटी, शर्तींमुळे ठिय्या घेण्यास ठेकेदार पुढे येत नसल्याने प्रशासनावर फेर लिलावाची वेळ येत आहे. सरकारी ठेका घेण्यापेक्षा गावकºयांच्या मदतीने नदीपात्रातील वाळू चोरीवरच तस्करांचा अधिक भर

ठळक मुद्देनद्यांना पूर : पावसाळ्यामुळे बांधकामे बंदवाळूचोरीच्या घटनांमध्येही कमालीची घट

नाशिक : पावसाळ्यामुळे बंद पडलेली बांधकामे व नद्यांना आलेल्या पुरामुळे नाशिक जिल्ह्यात चोरी, छुप्या पद्धतीने दररोज केल्या जाणाऱ्या वाळूतस्करीला आपोआपच चाप बसला असून, गेल्या महिन्यात यासंदर्भात वाळूचोरीच्या घटनांमध्येही कमालीची घट झाली आहे.नाशिक जिल्ह्यातील नदीपात्रातील वाळूंचे ठिय्ये गेल्या तीन वर्षांपासून लिलावाविना पडून असून, सरकारच्या नवीन वाळू धोरणातील जाचक अटी, शर्तींमुळे ठिय्या घेण्यास ठेकेदार पुढे येत नसल्याने प्रशासनावर फेर लिलावाची वेळ येत आहे. सरकारी ठेका घेण्यापेक्षा गावकºयांच्या मदतीने नदीपात्रातील वाळू चोरीवरच तस्करांचा अधिक भर असून, निर्माण झालेल्या वाळूच्या टंचाईमुळे गेल्या दोन वर्षांपासून वाळूचे ब्रासमागील दर दुपटीने वाढले आहेत. सध्या आठ ते नऊ हजार रुपये प्रती ब्रास असा वाळूचा दर आहे. नाशिक जिल्ह्यातील बहुतांशी वाळू ठिय्यांमध्ये आता वाळूच शिल्लक नसल्याचा अहवाल भूजल सर्वेक्षण, महसूल विभागाने दिला आहे. त्यामुळे बांधकाम क्षेत्राची वाळूची गरज पूर्ण करण्यासाठी जळगाव, नंदुरबार, सारंगखेडा, कोपरगाव या भागातून तस्करी करून वाळू आणली जात आहे. नाशिकबरोबरच लगतच्या ठाणे व नवी मुंबईतदेखील ही वाळू पाठविली जात असून, नाशिक शहरात दररोज २०० ते २५० वाळूचे ट्रक चोरी, छुप्या मार्गाने रवाना होत असल्याची आकडेवारी आहे. त्यातून शासनाचे कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडविला जात असून यामागे वाळूतस्कर, पोलीस व महसूल खात्याची भ्रष्ट साखळी कार्यरत आहे. वाळू तस्करांकडून महिन्याकाठी ‘हप्ते’ बांधून घेतल्यामुळे ठिय्यांतून यंत्राच्या सहाय्याने वारेमाप वाळू उपसा करण्यात आला. मात्र जुलै महिन्यापासून पावसाचे आगमन सुरू झाल्याने नदी, नाल्यांना पूर आला असून, धरणांच्या पाणी पातळीत वाढ झाल्यामुळे धरणातूनही पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याने उपसा करण्यात येणारे वाळू ठिय्ये पाण्याखाली गेले आहेत. अशातच पावसाळ्यामुळे सर्व प्रकारची बांधकामे बंद करण्यात आल्यामुळेही वाळूची मागणी घटली, परिणामी वाळूतस्करांना आपोआपच चाप बसला आहे.

टॅग्स :PoliceपोलिसNashikनाशिक