नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्याचे आकर्षक देशवासीयांनाच नव्हे, तर परदेशातील लोकांनाही आहे. यामुळेच साधुग्राममध्ये फिरताना काही परदेशी पाहुणे दिसतात. त्यापैकी कुणी फ्रान्समधून कुंभाच्या अभ्यासासाठी आलेले पथक, तर कुठे आॅस्ट्रेलियातून साधूंच्या जीवनाची माहिती जाणून घेणारे अभ्यासक झालेले असताना भारतीय संस्कृती आणि हिंदू धर्मातील परंपरांची माहिती जाणून घेण्याच्या उद्देशाने आलेल्या परदेशी दाम्पत्याने ‘कुंभ इज ग्रेट’ अशी उत्स्फूर्त प्रतिक्रिया व्यक्त केली. अर्थात होते. पहिल्या शाहीस्नानानिमित्त निघालेल्या शाही मिरवणुकीचे... तपोवनात तिन्ही प्रमुख आखाडे आणि त्यांच्या ५०० खालशांची मिरवणूक सकाळी निघाली. मिरवणुकीत सहभागी झालेली शेकडो वाहने आणि लाखो साधू व भाविक पाहून इंग्लंडहून आलेले मिस्टर जेम्स अक्षरक्ष: भारावून गेले. त्यांच्यासमवेत त्यांची पत्नी टामदेखील होती. ती मूळची युगोस्लोव्हियाची आहे. या तरुण जोडप्याने भारताची संस्कृती जाणून घेण्यासाठी दौरा सुरू केला असून, नाशिकच्या कुंभमेळ्याची माहिती मिळाल्यावर ते येथे पोहचले. मिरवणुकीतील जल्लोष पाहून त्यांनी आपल्या कॅमेऱ्यात अनेक फोटो टिपले. त्यातच अयोध्याच्या राजारामदास आश्रमाचे रूपनारायणदास महाराजांची मिरवणूक जात असताना यातील साधूंनी त्यांना संपूर्ण शाही मिरवणुकीची माहिती दिली आणि आपल्या अयोध्यातील आश्रमात येण्याचे आग्रहपूर्वक निमंत्रण दिले. या जोडप्यानेदेखील तेथे येण्याचे मान्य करीत त्यांचे दर्शन घेऊन निरोप घेतला.
‘कुंभ इज ग्रेट’
By admin | Updated: August 29, 2015 23:03 IST