शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

महसूल विभागाच्या दंडात्मक कारवाई विरोधात कुंभार समाज आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2019 17:26 IST

कुंभार समाज वीटभट्टी व्यवसायिकांना जागेचा अनाधिृत वापर व प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नियमासंदर्भात  स्थानिक तहसीलदार कार्यालयांकडून विविध समस्यांचा सामान कारवा लागत असून यासंदर्भात कुंभार समाजाच्या विटभट्टी व्यावसायिकांच्या समस्या तत्काळ दूर कराव्यात अशी मागणी अखिल महाराष्ट्र कुंभार समाज विकास संस्थेच्या माध्यमातून जिल्हाधिकारी कार्यालयात दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे. 

ठळक मुद्देजिल्हाधिकारी कार्यालयात कुंभार व्यावसायिकांचे निवेदन महसूल विभागाच्या कारवाई विरोधात आक्रमक भूमिका

नाशिक : कुंभार समाज वीटभट्टी व्यवसायिकांना जागेचा अनाधिृत वापर व प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नियमासंदर्भात  स्थानिक तहसीलदार कार्यालयांकडून विविध समस्यांचा सामान कारवा लागत असून यासंदर्भात कुंभार समाजाच्या विटभट्टी व्यावसायिकांच्या समस्या तत्काळ दूर कराव्यात अशी मागणी अखिल महाराष्ट्र कुंभार समाज विकास संस्थेच्या माध्यमातून जिल्हाधिकारी कार्यालयात दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाने कुंभार समाज व्यवसायिकांना त्यांच्या व्यवसायासाठी पाचशे ब्रास मातीवरील रॉयल्टी माफ करण्याचा निर्णय २१ जुलै २०१४ रोजी घेतला असून त्यासाठी ते ज्या जागेवर वीटभट्टी व्यवसाय करतात ती जागा आकृषिक करने बंधनकारक आहे. परंतु, नाशिक जिल्ह्यातील बहुसंख्य गावे ही वर्ग १ मध्ये समावेश झालेला असल्याने या भागातील जमीनी आकृषिक करण्याचे अधिकार ३१/८/ २००८ पासून उपविभागीय अधिकारी यांना आहेत. तहसीलदार कर्यालयात यासाठी प्रकरणे दाखल करूनही कोणतीही कारवाई होत नसून  इगतपुरी व कळवण वगळता अन्य तालुक्यातील व्यावसायिकांना अनाधिकृत जागेचा वापर केला म्हणून पंचवीस हजार व त्याहून अधिक रुपये दंडाच्या नोटीसा देऊन वीटभट्टी व्यवसायिकांकडून दंड वसूल करण्यात येत असल्याचा आरोप  कुंभार समाज विकास संस्थेने केला आहे.  त्याचप्रमाणे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ वीटभट्टी धोरण २०१६ नुसार वीटभट्टी व्यवसाय करणाऱ्या कुंभार समाज पारंपरिक वीटभट्टीला पर्यावरण विभागाच्या परवानगीची आवश्यकता नसतानाही तहसीलदार यांना या संबधीची तक्रार प्राप्त झाल्यानंतर ती प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे न पाठवता परस्पर महसूल विभागाकडून कार्यवाही केली जात असल्याचा आरोही अखिल महाराष्ट्र कुंभार समाज विकास संस्थेने दिलेल्या निवेदनातून करण्यात आला आहे. यावेळी महाराष्ट्र कुंभार समाज विकास संस्थेचे  अध्यक्ष - मोहन जगदाळे, प्रदेश कार्याध्यक्ष - रंगनाथ सुर्यवंशी,  सोमनाथ सोनवणे, राजेंद्र सावंदे, नरेंद्र कलंकार, तुषार गारे,कृष्णा सोनवणे, छाया सोनवणे, किरण शिकारे आदी उपस्थित होते.

टॅग्स :Revenue Departmentमहसूल विभागNashikनाशिकcollectorजिल्हाधिकारी