शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

‘स्वीकृत’च्या नियुक्त्या सप्टेंबरच्या महासभेत?

By admin | Updated: July 11, 2017 18:41 IST

गटनेत्यांची बैठक : २१ आॅगस्टपर्यंत प्रस्ताव मागविले

नाशिक : महापालिकेत पाच जागांवर स्वीकृत सदस्य म्हणून नियुक्त्या करण्याची प्रक्रिया राबविण्यासाठी आयुक्त अभिषेक कृष्ण यांच्याकडे मनसे वगळता सर्वपक्षीय गटनेत्यांची बैठक झाली. यावेळी, कॉँग्रेस-राष्ट्रवादीनेही आपला एक सदस्य नियुक्त करावा, अशी मागणी केली. दरम्यान, आयुक्तांनी २१ आॅगस्टपर्यंत तौलनिक संख्याबळानुसार स्वीकृत सदस्यत्वासाठी गटनेत्यांना प्रस्ताव सादर करण्याची सूचना केली असून, त्यानंतर सप्टेंबरमध्ये होणाऱ्या महासभेत महापौरांकडून नियुक्त्या जाहीर होण्याची शक्यता आहे.महापौर-उपमहापौरपदाच्या निवडीनंतर लवकरात लवकर स्वीकृत सदस्यांची निवड करण्यात यावी, असे महापालिका अधिनियमात स्पष्ट करण्यात आलेले आहे. मात्र, गेल्या चार महिन्यांपासून सदर प्रक्रिया रखडली होती. अखेर, नियुक्ती प्रक्रिया राबविण्यासाठी आयुक्तांनी मंगळवारी सर्वपक्षीय गटनेत्यांची बैठक बोलाविली होती. बैठकीला महापौर रंजना भानसी, उपमहापौर प्रथमेश गिते, सभागृहनेता दिनकर पाटील, विरोधी पक्षनेता अजय बोरस्ते, भाजपा गटनेता संभाजी मोरुस्कर, कॉँग्रेस गटनेता शाहू खैरे, राष्ट्रवादीचे गटनेता गजानन शेलार, रिपाइंच्या दीक्षा लोंढे आदी उपस्थित होते. यावेळी, नगरसचिव ए. पी. वाघ यांनी तौलनिक संख्याबळानुसार भाजपाचे तीन आणि सेनेचे दोन सदस्य नियुक्त होऊ शकतात, असे स्पष्ट करत नियुक्तीची प्रक्रिया समजावून सांगितली. यावेळी कॉँग्रेस-राष्ट्रवादीने दोन्ही पक्ष एकत्र आल्यास एक सदस्य नियुक्त करण्याची मागणी केली. त्यावर आयुक्तांनी त्याबाबतचे लेखी पत्र देण्याची सूचना करत कायदेशीर बाबी पडताळून निर्णय घेण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. कॉँग्रेस-राष्ट्रवादीने त्यासाठी मुदत मागितली असता आयुक्तांनी २१ आॅगस्टपर्यंत गटनेत्यांनी सदस्यांच्या नावांचे प्रस्ताव सादर करावेत, असे सांगितले. त्यामुळे २१ आॅगस्टपर्यंत स्वीकृत सदस्यत्वासाठी प्रस्ताव सादर केले जाणार असून, त्यानंतर प्राप्त अर्जांची छाननी करून अंतिम नावे महासभेला सादर केली जाणार आहेत. त्यामुळे सप्टेंबरच्या महासभेत स्वीकृत सदस्यांच्या नियुक्त्या जाहीर होण्याची शक्यता आहे.