शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

सिन्नर  नगरपरिषदेच्या  सभेत  १०४ कोटींच्या अर्थसंकल्पास मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2018 00:20 IST

सन २०१८-१९ च्या १०४ कोटी २६ लाख ५० हजार ८८९ रूपयांच्या अर्थसंकल्पास बुधवारी झालेल्या नगरपरिषदेच्या विशेष सर्वसाधारण सभेत मंजुरी देण्यात आली. कोणतीही करवाढ नसलेला तसेच शहरातील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प, स्वच्छता आणि मैला व्यवस्थापन व मुलभूत कामांसाठी तरतूद असलेल्या अंदाजपत्रकास मंजूरी देण्यात आली. करवाढ नसल्याने सिन्नरकरांना दिलासा देणारा अर्थसंकल्प ठरला.

सिन्नर : सन २०१८-१९ च्या १०४ कोटी २६ लाख ५० हजार ८८९ रूपयांच्या अर्थसंकल्पास बुधवारी झालेल्या नगरपरिषदेच्या विशेष सर्वसाधारण सभेत मंजुरी देण्यात आली. कोणतीही करवाढ नसलेला तसेच शहरातील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प, स्वच्छता आणि मैला व्यवस्थापन व मुलभूत कामांसाठी तरतूद असलेल्या अंदाजपत्रकास मंजूरी देण्यात आली. करवाढ नसल्याने सिन्नरकरांना दिलासा देणारा अर्थसंकल्प ठरला. प्रभारी नगराध्यक्ष प्रमोद चोथवे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सर्वसाधारण सभेत मुख्याधिकारी व्यंकटेश दूर्वास यांनी अंदाजपत्रकाच्या जमाखर्चाची मांडणी सादर केली. गटनेते हेमंत वाजे, पाणी पुरवठा सभापती पंकज मोरे, विरोधी पक्षनेते नामदेव लोंढे, नगरसेवक शैलेश नाईक, गोविंद लोखंडे, सोमनाथ पावसे, बाळासाहेब उगले, संतोष शिंदे, श्रीकांत जाधव, मल्लू पाबळे, सुहास गोजरे, रु पेश मुठे, प्रीती वायचळे, नलिनी गाडे, शितल कानडी, अलका बोडके, प्रणाली भाटजिरे, सुजाता तेलंग, विजया बर्डे, वासंती देशमुख, ज्योती वामने, गीता वरंदळ, मालती भोळे, करनिरिक्षक नीलेश बाविस्कर, प्रकल्प अधिकारी अनिल जाधव, लेखाधिकारी भीमराव संसारे, स्थापत्य अभियंता जनार्धन फुलारी, अशोक कटारे, अनुप गुजराथी, नीलेश भुसे आदी उपस्थित होते. पंधरा दिवसांपूर्वी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत सुमारे १०७ कोटींचा अर्थसंकल्प प्रशासनाने सादर केला होता. स्थायी समितीच्या सदस्यांनी सांगितलेल्या किरकोळ दुरूस्तीसह अर्थसंकल्पाला मान्यता देण्यात आली होती. बुधवारी झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेत सुमारे १०४ कोटींच्या अर्थसंकल्पास अंतिम मान्यता देण्यात आली.अर्थसंकल्पातील वैशिष्टयेअंदाजे स्वउत्पन्न ८ कोटी ४५ लाख कडवा योजनेसाठी ८ कोटीची कर्ज उभारणी, सातवा वेतन आयोग लागू झाल्यास ३० लाख रुपयांची तरतूद, ग्रामीण रुग्णालाय सुरु झाल्यानंतरही नगरपरिषद स्वत:चा दवाखाना सुरु च ठेवणार, पंतप्रधान आवास योजनेतून ७०० लाभार्थ्यांचे उद्दीष्ट, हद्दवाढ भागात विशेष अर्थसहाय्यक योजनेतून १० कोटी रु पयांच्या कामांचे प्रस्ताव, घनकचरा व्यवस्थ्थापनाचा ६ कोटी ५६ लाखांचा सविस्तर प्रकल्प अहवाल शासनाला सादर, खतप्रकल्पावरील संपुर्ण कचºयाचे विघटन होणार, शहरासह उपनगरांमध्ये कचरा संकलनासाठी ११ नव्या घंटागाडी व मिनी जेसीबी खरेदी करणार, मैला व्यवस्थापन प्रक्रिया प्रकल्पासाठी पावणे दोन कोटींची तरतूद, राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानांतर्गत शिवाजीनगरला प्राथमिक आरोग्य केंद्र, नगरपरिषद हद्दीतील चार जि.प. शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी स्वच्छतागृहाची करणार उभारणी, नायगाव रस्त्यावरील शॉपिंग सेंटरसाठी तीन कोटींची तरतूद, महिला व बालकल्याण समितीला ४० लाखांचा निधी.नदी सौंदर्यकरणासाठी दीड कोटीसरस्वती नदीचे सौंदर्यकरण हाती घेण्यात येणार आहे. त्यासाठी १ कोटी ५५ लाख रुपयांची तरतूद नगरपरिषदेने केली आहे. पहिल्या टप्प्यातील कामे यंदा उरकण्यावर भर आहे. यात देवी मंदिर ते नवापूल ७६० मीटर अंतरातील नदीत सोडलेले गटारीचे बंदिस्त स्वरु पात गावपाटात सोडण्यात येणार आहे.  नदीतील गाळाचा उपसा करुन ती स्वच्छ करण्यात येणार आहे. शिवाय नदीच्या दोन्ही बाजूस असलेल्या शॉपींग  कॉम्प्लेक्सच्या पाठीमागील भींतींना सुरक्षीत करण्यासाठी उपाययोजना करण्यात येणार आहे.

टॅग्स :Budgetअर्थसंकल्प