शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

४९३ ग्रामपंचायतींवर प्रशासकांची नेमणूक; ध्वजारोहणाचाही मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2020 00:59 IST

नाशिक : गेल्या दोन महिन्यांपासून रिक्त असलेल्या जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या प्रशासकपदी अखेर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील ग्रामीण भागात कार्यरत असलेल्या शासकीय अधिकाऱ्यांची नेमणूक करून, या पदावर राजकीय, सामाजिक व्यक्ती नेमण्यावरून सुरू असलेल्या वादावर पडदा टाकला आहे. विशेष म्हणजे स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला या नेमणुका करण्यात आल्याने यातील काही प्रशासकांनी ग्रामपंचायतीत ध्वजारोहण करण्याचा मानही मिळवला आहे.

ठळक मुद्दे राजकीय कार्यकर्ते हिरमुसले : जिल्हा परिषद प्रशासनाचा निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : गेल्या दोन महिन्यांपासून रिक्त असलेल्या जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या प्रशासकपदी अखेर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील ग्रामीण भागात कार्यरत असलेल्या शासकीय अधिकाऱ्यांची नेमणूक करून, या पदावर राजकीय, सामाजिक व्यक्ती नेमण्यावरून सुरू असलेल्या वादावर पडदा टाकला आहे. विशेष म्हणजे स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला या नेमणुका करण्यात आल्याने यातील काही प्रशासकांनी ग्रामपंचायतीत ध्वजारोहण करण्याचा मानही मिळवला आहे.कोरोनामुळे मार्च महिन्यापासून देशभर लॉकडाऊन पळाला जात असून, सार्वजनिक ठिकाणी गर्दी होऊ नये असे शासनाचे आदेश आहेत. त्यामुळे राज्य सरकारने मार्च महिन्यापासून सर्व प्रकारच्या सहकारी संस्थांच्या निवडणुका स्थगित केल्या आहेत, त्याचा परिणाम ग्रामपंचायतींच्या कामकाजावर झाला. अनेक ग्रामपंचायतींच्या सरपंचांची मुदत संपल्यामुळे ग्रामपंचायतींचा कारभार कोणी आणि कसा पहायचा, असा प्रश्न निर्माण होऊन गावाचा विकास खुंटला होता. शासनाच्या सूचनामुळे निवडणूक घेता येत नसल्यामुळे अखेर या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्यास शासनाने अनुमती दिली व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी त्या त्या जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांशी चर्चा करून प्रशासकाची नेमणूक करण्याच्या सूचना दिल्या, मात्र अशा नेमणुका करताना गावाने एकमुखी नावाची शिफारस करावी व त्याला पालकमंत्री यांनी अनुमती द्यावी अशी अट घातली.राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असल्यामुळे साहजिकच सेना, राष्ट्रवादी, काँग्रेस या पक्षाशी संबंधित व्यक्ती ग्रामपंचायतीवर प्रशासक म्हणून नेमले जाणार असल्याची भीती व्यक्त करून विरोधी पक्षांनी या निर्णयाला विरोध दर्शविला होता. सरकारच्या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्या असून, त्याची सुनावणी सुरू आहे. त्यामुळे सरकारने पुन्हा आपल्या निर्णयात बदल करून ग्रामपंचायतींवर शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी यांची नेमणूक करावी, असे आदेश काढले.नाशिक जिल्ह्यात गेल्या पाच महिन्यांत सुमारे सहाशेहून अधिक ग्रामपंचायतींच्या सरपंचांची मुदत संपुष्टात आल्याने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी ग्रामविकासाठी ग्रामपंचायतींवर सरकारी अधिकारी व कर्मचाºयांना नेमण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार जिल्ह्यातील ४९३ ग्रामपंचायतीवर प्रशासकांची नेमणूक केली. प्रशासक म्हणून नेमलेल्यांमध्ये कृषी, शिक्षण, आरोग्य खात्याच्ये विस्तार अधिकारी, बांधकाम खात्याचे शाखा अभियंता यांचा समावेश आहे. प्रशासक नेमण्यात आल्याने गावातील प्रश्न सुटण्यास मदत झाली आहे. काही प्रशासकांनी पदभार स्वीकारून ध्वजारोहणही केले.

तालुकानिहाय नेमलेले प्रशासक

येवला- ३९दिंडोरी- ७सिन्नर- ९८इगतपुरी- २चांदवड- ५२देवळा- ९त्रंबकेश्वर- २नांदगाव- ५५नाशिक- २५निफाड- ६२बागलाण- ३२मालेगाव- ९९.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूक