शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सिन्नर तालुक्यात एक अर्ज अवैध

By admin | Updated: February 8, 2017 00:33 IST

सिन्नर तालुक्यात एक अर्ज अवैध

सिन्नर : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांची मंगळवारी तहसील कार्यालयात छाननी करण्यात आली. त्यात जिल्हा परिषदेसाठी दाखल झालेले सर्व अर्ज वैध ठरले, तर पंचायत समितीसाठी भरतपूर गणातील एक अर्ज अवैध ठरला.  सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची मुदत होती. जिल्हा परिषदेच्या सहा गटांसाठी ५४, तर पंचायत समितीच्या बारा गणांसाठी १११ अर्ज दाखल झाले होते. मंगळवारी सकाळी ११ वाजता निवडणूक अधिकारी विठ्ठल सोनवणे, तहसीलदार मनोजकुमार खैरनार यांनी उमेदवारी अर्जांची छाननी सुरू केली. सर्वप्रथम जिल्हा परिषदेच्या सहा गटांची छाननी करण्यात आली. त्यात पक्षाचा प्रमुख एबी फॉर्म असलेल्या उमेदवारास पक्षाचा अधिकृत उमेदवार ठरविण्यात आले, तर पर्यायी उमेदवारास अपक्ष म्हणून ग्राह्य धरण्यात आले. जिल्हा परिषदेचे सर्व ५४ अर्ज वैध ठरले.  त्यानंतर पंचायत समितीची गणनिहाय छाननी सुरू करण्यात आली. भरतपूर गण ओबीसी महिलेसाठी राखीव असून, या गणातून मिरगाव येथील स्नेहल अभिमन शेळके यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र त्यांचे वय २१ वर्षे पूर्ण नसल्याने त्यांना उमेदवार म्हणून ग्राह्य धरता येणार नसल्याचे सांगत त्यांचा उमेदवारी अर्ज अवैध ठरविण्यात आला.  नायगाव या ओबीसी गणातील उमेदवार बबन भाऊसाहेब लोहकरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल असलेल्या गुन्ह्यासंदर्भात वैध किंवा अवैध ठरवावा यासंदर्भात निकाल राखून ठेवण्यात आला होता. मात्र लोहकरे यांनी मुदतीत कागदपत्रे सादर केल्याने त्यांचा अर्ज वैध ठरविण्यात आला. छाननीसाठी राजकीय पक्षांचे पदाधिकारी व उमेदवार उपस्थित होते. (वार्ताहर)