नाशिकरोड : मनपा निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरण्याच्या सोमवारी चौथ्या दिवशी प्रभाग १९ अनुसूचित जाती गटातून एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाला. राजकीय पक्षांनी उमेदवारांची पहिली यादीसुद्धा अद्यापपर्यंत जाहीर न केल्याने इच्छुक ‘वेट अॅन्ड वॉच’च्या भूमिकेत आहे. मनपा निवडणुकीत शिवसेना, भाजपाकडे इच्छुकांच्या झालेल्या भाऊगर्दीमुळे पक्षीय पदाधिकाऱ्यांची उमेदवारी निश्चित करताना डोकेदुखी वाढली आहे. तर कॉँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी, मनसे यांच्याकडे प्रबळ इच्छुकांचा वानवा असल्यामुळे पक्षीय पदाधिकारी चिंतेत आहे. उमेदवारी अर्ज भरण्याच्या चौथ्या दिवशी एकाही राजकीय पक्षाची उमेदवारांची पहिली यादी जाहीर झालेली नव्हती. त्यामुळे इच्छुक अद्यापही उमेदवारी मिळविण्यासाठी सर्व स्तरावर प्रयत्न करत आहेत. यामुळे मनपा विभागीय कार्यालयात निवडणूक विभागाकडे उमेदवारी दाखल करण्यासाठी कोणी फिरकत नसल्याचे चित्र दिसत आहे. सोमवारी प्रभाग १९ (अ) अनुसूचित जाती या गटातुन अपक्ष म्हणून नंदकुमार रामदास आहेर यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाला आहे. (प्रतिनिधी)
नाशिकरोडला अनुसूचित जाती गटातून अर्ज दाखल
By admin | Updated: January 31, 2017 00:20 IST