येवला : सातारा जिल्ह्यातील कर्पेवाडी येथील भाग्यश्री संतोष माने (१७) या महाविद्यालयीन युवतीचा भरदिवसा गळा चिरून खून करण्यात आला. या घटनेचा येवला येथे नाभिक समाजतर्फे जाहीर निषेध करण्यात येऊन आरोपींना तत्काळ अटक करून फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी नाभिक समाजबांधवांकडून करण्यात आली आहे. यासंदर्भात नायब तहसीलदार प्रकाश बुरुंगले यांना निवेदन देण्यात आले आहे.घटनेचा पारदर्शकपणे व जलद तपास करावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. यावेळी डी. बी. जाधव, सचिन सोनवणे, गणेश जाधव, राजेंद्र आहेर, विशाल परदेशी, राजेंद्र हिरे, अतुल व्यवहारे, रंगनाथ व्यवहारे, निखिल जाधव, पवन संत, शांतिलाल पवार, गणेश पवार, कृष्णा संत, अजय वाघ, सुधीर सोनवणे, भूषण हिरे आदी समाजबांधव उपस्थित होते.
विद्यार्थिनीच्या खूनप्रकरणी नाभिक समाजाचे तहसीलदारांना निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2019 23:51 IST
येवला : सातारा जिल्ह्यातील कर्पेवाडी येथील भाग्यश्री संतोष माने (१७) या महाविद्यालयीन युवतीचा भरदिवसा गळा चिरून खून करण्यात आला. या घटनेचा येवला येथे नाभिक समाजतर्फे जाहीर निषेध करण्यात येऊन आरोपींना तत्काळ अटक करून फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी नाभिक समाजबांधवांकडून करण्यात आली आहे. यासंदर्भात नायब तहसीलदार प्रकाश बुरुंगले यांना निवेदन देण्यात आले आहे.
विद्यार्थिनीच्या खूनप्रकरणी नाभिक समाजाचे तहसीलदारांना निवेदन
ठळक मुद्देघटनेचा पारदर्शकपणे व जलद तपास करावा, अशी मागणी