शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

व्यसनमुक्त जीवन जगण्याचे प्रदोष कार्यक्रमात आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2019 17:21 IST

पिंपळगाव बसवंत : फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप व वेगवेगळ्या जीवघेण्या गेम्सच्या जाळ्यात आजचा तरु ण अडकलेला आहे. आजच्या तरु णांनी हातातील मोबाइलसह व्यसनमुक्तीकडे वळण्याची गरज असल्याचे मत हभप रामायणाचार्य भास्कर रसाळ महाराज यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देपिंपळगाव बसवंत परिसरातील अंबिकानगर येथील शिवलिंग व जगद्गुरु जनार्दन स्वामी महाराज मंदिराचा वर्धापनदिन व मासिक प्रदोष संपन्न झाला

पिंपळगाव बसवंत : फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप व वेगवेगळ्या जीवघेण्या गेम्सच्या जाळ्यात आजचा तरु ण अडकलेला आहे. आजच्या तरु णांनी हातातील मोबाइलसह व्यसनमुक्तीकडे वळण्याची गरज असल्याचे मत हभप रामायणाचार्य भास्कर रसाळ महाराज यांनी व्यक्त केले. पिंपळगाव बसवंत परिसरातील अंबिकानगर येथील शिवलिंग व जगद्गुरु जनार्दन स्वामी महाराज मंदिराचा वर्धापनदिन व मासिक प्रदोष संपन्न झाला. यानिमित्त आयोजित कार्यक्र मात ते बोलत होते.अध्यात्म हे परिपूर्ण ज्ञान आहे, आत्मा-दैवी ज्ञान संबंधित आहे, विज्ञानाच्या साह्याने मानवाने प्रगती केली आहे; पण तितकेच नुकसानदेखील केले आहे, ग्रंथ पुराणे सोडून फेसबुक व्हॉट्सअ‍ॅप व मोबाइलवरील वेगवेगळ्या जीवघेण्या गेम्सच्या जाळ्यात आजचा तरु ण अडकलेला आहे. आजच्या मनुष्याला भगवद्गीता, पुराण यावर विश्वास राहिला नाही त्यामुळे दैवी ज्ञानाचा उपयोग आताच्या मानवाला होत नाही. विज्ञान सोडा व आध्यात्मिकाचे पाय धरा तेव्हाच आजचा तरु ण व्यसनमुक्त होईल, असे प्रतिपादन रामायणाचार्य भास्कर रसाळ आहेरगावकर महाराज यांनी केले. यावेळी रामराव डेरे, मनोज शेवरे, पुंडलिक मेधणे, ज्ञानेश्वर बनकर, नाना कुमावत, विजय जाधव, संजय विधाते, भाऊसाहेब खराटे, हनुमंत शेवरे, सचिन कायस्थ, कोंडाजी मोरे आदी उपस्थित होते.याप्रसंगी रामराव डेरे यांनी मनोगतात सांगितले की, मंदिर झाल्यापासून अनेक तरु ण जय बाबाजी भक्त मंडळाच्या सान्निध्यात आले व ते व्यसनमुक्त झाले. वेळोवेळी सामाजिक उपक्र म राबवून व्यसनात अडकलेल्या तरु णांना समाजाच्या योग्य प्रवाहात आणण्यासाठी मासिक प्रदोष कार्यक्र म घेतले जातात.या कार्यक्र मात माजी सैनिक मुरलीधर विधाते यांनी अन्नदान केले. पुढील मासिक प्रदोषात बळी विधाते यांनी अन्नदान करणार असल्याचे सांगितले. बाबाजी भक्त परिवारातर्फेत्यांचे स्वागत व आभार मानण्यात आले.यावेळी नवनाथ विधाते, विनोद विधाते, अमोल आंबेकर, गणेश पवार, अरु ण खोडे, जितू खोडे, ज्ञानेश्वर चव्हाण, लखन शिंदे, हरी शेवरे, श्रवण सोनवणे आदींसह पिंपळगाव परिसरातील भाविक उपस्थित होते.