ओझर : अखिल भारतीय मराठा महासंघ ओझर यांच्या वतीने दि. ९ आॅगस्ट २०१७ रोजी मुंबई येथे होणाºया मराठा क्रांती महामोर्चात सहभागी होण्याचे आवाहन करण्यासाठी येथे रॅली काढण्यात आली. रॅलीची सुरुवात ओझर यात्रा मैदान येथून दि. ३० जुलै २०१७ रोजी सकाळी १० वाजता झाली. संपूर्ण निफाड तालुक्यात मोटारसायकल रॅली काढून जनजागृती करण्यात आली.या रॅलीत मराठा महासंघ निफाड तालुका अध्यक्ष अशोक कदम, ओझर मराठा महासंघ अध्यक्ष दीपक जाधव, टाऊनशिप मराठा महासंघ अध्यक्ष दीपक पाटील, सतीश पगार, आशिष उगले, श्रीकांत पगार, रमेश शेळके, नितीन काळे, गणेश गवळी, नारायणराव शेटे, राजेंद्र मोरे, प्रमोद खांदवे, दौलत देवकर, हृषिकेशकदम, दत्तात्रय कदम, आशिष शिंदे, प्रकाश घुमरे, राजाभाऊ देशमुख, संदीप झोमन, तानाजी चिमणे,किरण गुढघे, वैभव जाधव, विजय न्याहारकर, जितेंद्र वाळुंज, धनेश कदम, गणेश पवार यांनी रॅलीच्या माध्यमातून संपूर्ण तालुका पिंजून काढत निफाड तालुक्यातील मराठा समाजाला मुंबई येथे महामोर्चाला येण्याचे जाहीर आवाहन केले. मुंबईला होणाºया रॅलीत सहभागी व्हावे यासाठी नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे. ओझर येथील तरुणांनी महाविद्यालये व विविध संस्थांशी तसेच मराठा बांधवांशी संपर्क सुरू ठेवला आहे.
मराठा रॅलीत सहभागी होण्याचे आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2017 00:10 IST