शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

उद्योजकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी अ‍ॅप आयमाचे अध्यक्ष वरुण तलवार : नूतन कार्यकारिणीने स्वीकारला पदभार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2018 01:24 IST

सिडको : उद्योजकांच्या समस्या जाणून घेण्याकरिता आयमाच्या वतीने लवकरच नवीन अ‍ॅप सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा आयमाचे नवनिर्वाचित अध्यक्ष वरुण तलवार यांनी दिली आहे.

ठळक मुद्देउद्योजकांना नेहमी विविध समस्यांना सामोरे जावे लागतेलवकरच आयमा अ‍ॅप सुरू करणार

सिडको : उद्योजकांच्या समस्या जाणून घेण्याकरिता आयमाच्या वतीने लवकरच नवीन अ‍ॅप सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा आयमाचे नवनिर्वाचित अध्यक्ष वरुण तलवार यांनी दिली आहे.आयमाचे नूतन अध्यक्ष वरुण तलवार यांनी मावळते अध्यक्ष राजेंद्र अहिरे यांच्याकडून सर्वसाधारण सभेत गुरुवारी (दि. ३१) पदभार स्वीकारला. यावेळी व्यासपीठावर डी.जी. कुलकर्णी, निखिल पांचाळ, ललित बूब, राजेंद्र अहिरे, एस. एस. आनंद, योगीता अहेर आदी उपस्थित होते. यावेळी तलवार यांनी उद्योजकांना नेहमी विविध समस्यांना सामोरे जावे लागते. या तक्र ारींची सोडवणूक महापालिका, पोलीस विभाग तसेच लोकप्रतिनिधी यांच्याकडे जाऊन सोडवाव्या लागतात. यामध्ये वेळेचा अपव्यय होतो. कामे अडून पडतात. याकरिता लवकरच आयमा अ‍ॅप सुरू करणार असल्याचे सांगितले. तसेच जाहीरनाम्यातील सर्व अडचणी दोन वर्षांच्या कालावधीत सोडविण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले.माजी अध्यक्ष धनंजय बेळे यांनी बोलताना सांगितले की, आयमाला येत्या काळात अनेक नवीन आव्हानांचा सामना करावा लागणार आहे. कामगार युनियन जर कारखाना बंद पाडण्याची भाषा करत असतील तर उद्योजकांनीही एकत्र येऊन विचार करावा लागेल, असेही ते म्हणाले. तर अध्यक्षपदाच्या निवडणुकीत पराभूत झालेले उमेदवार तुषार चव्हाण यांनी यापुढे आयमाच्या सर्वच कामात आपण मदत करणार असल्याचे सांगितले. महाराष्ट्र चेंबर्स आॅफ कॉमर्सचे नवनिर्वाचित अध्यक्ष संतोष मंडलेचा यांनी भविष्यात आयमा व चेंबर्स मिळून काम करण्याची तयारी दर्शविली. उद्योगभारतीचे अध्यक्ष जयंत महाजन यांनी आयमा संदर्भातील खटले सामंजस्याने मिटविण्याचे आवाहन करून सदस्यांना एसएमएस सुविधा सुरू करण्याची मागणी केली. यावेळी आयमाचे माजी अध्यक्ष, पदाधिकारी व सदस्यगण मोठ्या संख्येने उपस्थित होते.