शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

संकेतस्थळ हॅकिंगबरोबरच आरटीओत बरेच काही़़़

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2017 00:19 IST

देशातील पहिलेच स्वयंचलित वाहन तपासणीचे केंद्र तसेच केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन झालेले नाशिकचे हे केंद्र कायमच एजंट, वाहनमालक व आरटीओ अधिकारी यांच्यामुळे वादातीत राहिले व त्याची तोडफोडही झाली़ त्यातच मोटार परिवहन निरीक्षकाचे शासकीय संकेतस्थळावरील अकाउंट हॅक करून लॉगीन आयडी व पासवर्डद्वारे व्यावसायिक वाहन तपासणीसाठी न आणता फिटनेस प्रमाणपत्रास परवानगी दिल्याचा प्रकार उघडकीस आला़

विजय मोरे ।लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : देशातील पहिलेच स्वयंचलित वाहन तपासणीचे केंद्र तसेच केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन झालेले नाशिकचे हे केंद्र कायमच एजंट, वाहनमालक व आरटीओ अधिकारी यांच्यामुळे वादातीत राहिले व त्याची तोडफोडही झाली़ त्यातच मोटार परिवहन निरीक्षकाचे शासकीय संकेतस्थळावरील अकाउंट हॅक करून लॉगीन आयडी व पासवर्डद्वारे व्यावसायिक वाहन तपासणीसाठी न आणता फिटनेस प्रमाणपत्रास परवानगी दिल्याचा प्रकार उघडकीस आला़ विशेष म्हणजे संबधित केंद्र आरटीओकडे हस्तांतरित करण्यास काही दिवस उलटत नाही तोच हॅकिंगचा प्रकार घडल्याने अनेक शंका उपस्थित केल्या जात आहेत़ आरटीओ कार्यालयात एका कामासाठी येणाºया नागरिकांना कर्मचाºयांच्या मेहेरबानीमुळे किमान चार-पाच वेळा तरी चकरा माराव्याच लागतात़ मात्र हेच काम तुम्ही एजंटकडून नेल्यास चुटकीसरशी काम होते़ शासनाने आॅनलाइन सुविधाप्रणालीद्वारे या भ्रष्टाचाराच्या कुरणास चाप बसविण्याचा प्रयत्न केला असला तरी यामुळे सामान्य नागरिकांच्या समस्या कमी न होता त्यात आणखीच वाढ झाली आहे़ सतत कोणत्या न कोणत्या सबबीखाली नागरिकांना कर्मचारी चकरा मारण्यास भाग पाडतात अखेर कंटाळलेला नागरिक एजंटकडे धाव घेतो अन् एजंटही अधिकाºयांसोबत असलेल्या अर्थपूर्ण संबंधातून काम करून देतो़  रोझमार्टा टेक्नॉलॉजीज् या कंपनीला काही कालावधीसाठी स्वयंचलित वाहन तपासणीचे काम देण्यात आले होते़ केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते जून २०१५ ला या केंद्राचे शानदार उद्घाटन होऊन आॅक्टोबर २०१५ मध्ये कार्यान्वित झाले़ सदोष वाहनांमुळे होणारे रस्ते अपघात, प्रदूषण रोखण्याच्या उद्देशातून व वाहन तपासणीतील अचुकता या केंद्राचे वैशिष्ट होते़ मात्र, एजंट व व्यावसायिक वाहनचालकांनी अधिकाºयांच्या मूक पाठिंब्यातून यास सुरुवातीपासूनच विरोध केला़ या तपासणी केंद्रात वाहनातील अचुकतेशिवाय प्रमाणपत्र मिळत नसल्याने तोडफोड करण्यात आली होती़ व्यावसायिक व प्रवासी वाहनाची ठराविक कालावधीनंतर आरटीओकडून तपासणी केली जाते़ या तपासणी वाहनात आढळणारे दोष दूर केल्यानंतरच योग्यता प्रमाणपत्र दिले जाते़ स्वयंचलित वाहन तपासणी केंद्र चालविणाºया कंपनीचा ठेका जुलै २०१७ मध्ये संपल्याची माहिती असून, त्यानंतर हे केंद्र आरटीओकडे हस्तांतरित करण्यात आले आहे़ यास उणेपुरे काही दिवस उलटत नाही तोच परिवहन निरीक्षकाचे अकाउंट हॅक करून वाहनाची तपासणी न करता योग्यता प्रमाणपत्र दिल्याची घटना घडली़