शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
7
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
8
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
9
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
10
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
11
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
12
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
13
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
14
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
15
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
16
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
17
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
18
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
19
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
20
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
Daily Top 2Weekly Top 5

दुकानदारांसह भाजीविक्रेत्यांची अ‍ॅँटिजेन चाचणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2020 01:28 IST

कोेरोनाबाधितांची संख्या शहरात वाढत आहे, तथापि, नियंत्रणासाठी सुरू असलेल्या कार्यवाहीतून सामूहिक संसर्ग सुरू होऊ नये यासाठी महापालिकेच्या वतीने शहरातील सर्व किराणा दुकानदार तसेच दूध-भाजीपाला विक्रेत्यांची अ‍ॅँटिजेन चाचणी करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देपूर्वदक्षता। समूह संसर्ग टाळण्यासाठी मनपाकडून कार्यवाही; फिरत्या दवाखान्यांच्या माध्यमातून होणार चाचण्या

नाशिक : कोेरोनाबाधितांची संख्या शहरात वाढत आहे, तथापि, नियंत्रणासाठी सुरू असलेल्या कार्यवाहीतून सामूहिक संसर्ग सुरू होऊ नये यासाठी महापालिकेच्या वतीने शहरातील सर्व किराणा दुकानदार तसेच दूध-भाजीपाला विक्रेत्यांची अ‍ॅँटिजेन चाचणी करण्यात येणार आहे.फिरत्या दवाखान्यांच्या माध्यमातून ही चाचणी केली केली जाणार आहे. महापालिकेचे आयुक्त कैलास जाधव यांनी यासंदर्भात विभागीय अधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत. नाशिक शहरात कोरोनाचे संसर्ग अधिक वाढू नये यासाठी मिशन झिरो नाशिक ही योजना राबविली जात आहे. मात्र, त्यानंतरदेखील रुग्ण संख्या वाढत आहे. गेल्या दहा दिवसांतच तब्बल ५ हजार २२३ नवे रुग्ण आढळले आहेत तर पाच महिन्यात ४७२ जणांचा कोरोनामुळे बळी घेतल्याने चिंतेचे वातावरण आहे. कोरोना बळींची वाढती संख्या नियंत्रणात आणण्यासाठी महापालिकेच्या वतीने विविध व्याधींनीग्रस्त कोमॉर्बिड रुग्णांना वैद्यकीय उपचाराची सुविधा दिली जात आहे. मात्र, आता वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता  कोरोनाच्या समूह संसर्गाची भीती व्यक्त केली जात आहे. ती टाळण्यासाठी महापालिकेच्या वतीने शहरातील किराणा दुकानदार, दूध व भाजीपाला विक्रेत्यांची अ‍ॅँटिजेनचाचणी करण्याचे आदेश आयुक्त कैलास जाधव यांनी सर्व विभागीय अधिकाऱ्यांना दिले आहेत.होमिओपॅथिक गोळ्याचे वाटपया चाचण्या घेण्यासाठी मोबाइल डिस्पेन्सरी व्हॅनचा वापर केला जाणार आहे. त्यामुळे त्या त्या भागात जाऊन अशाप्रकारची चाचणी तपासली जाणार आहे. दरम्यान, महापालिकेने विभागीय स्तरावरून ३ लाख ३२ हजार होमिओपॅथीकच्या आर्सेनिक अल्बम गोळ्यांच्या बाटल्यांचे वाटप करण्यात येणार आहे. सहाही विभागीय कार्यालयांमार्फत आतापर्यंत दोन लाख ३३ लाख बाटल्यांचे वाटप करण्यात येत आहे. कोरोनाला रोखण्यासाठी आणि विशेषत: प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी हे औषध उपयुक्त ठरत आहे. असा दावा अनेक डॉक्टरांनी केला असून, त्यासाठी या औषधांचा वापर केला गेला आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाcorona virusकोरोना वायरस बातम्या