शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

विरोध झुगारत स्मशानभूमीत अंत्यविधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2017 00:35 IST

येथील उंटवाडी स्मशानभूमीची दुरुस्ती करू नये तसेच याठिकाणी अंत्यविधी करण्यास स्थानिक नागरिकांनी विरोध दर्शविला असला तरी सदरची जागा ही पूर्वीपासूनच स्मशानभूमीसाठी राखीव असल्याने शनिवारी (दि.४) याठिकाणी विरोध झुगारून लिंगायत समाजाच्या वतीने पोलीस बंदोबस्तात अंत्यविधी करण्यात आला.

सिडको : येथील उंटवाडी स्मशानभूमीची दुरुस्ती करू नये तसेच याठिकाणी अंत्यविधी करण्यास स्थानिक नागरिकांनी विरोध दर्शविला असला तरी सदरची जागा ही पूर्वीपासूनच स्मशानभूमीसाठी राखीव असल्याने शनिवारी (दि.४) याठिकाणी विरोध झुगारून लिंगायत समाजाच्या वतीने पोलीस बंदोबस्तात अंत्यविधी करण्यात आला.  येथील प्रभाग क्रमांक २५ मध्ये समाविष्ट असलेल्या उंटवाडी येथील स्मशानभूमीच्या दुरुस्तीचे काम करण्यासाठी नगरसेवक हर्षा बडगुजर यांनी त्यांच्या नगरसेवक निधीची तरतूद केली आहे. परंतु सदरची स्मशानभूमी ही गेल्या अनेक वर्षांपासून बंद असून, सध्या याठिकाणी कोणत्याही प्रकारचे अंत्यविधी केले जात नाही. तरीदेखील मनपाने याठिकाणी दुरुस्तीकामासाठी एक कोटीहून अधिक निधी मंजूर केला असून, यास परिसरातील नागरिकांचा विरोध आहे. स्मशानभूमीलगत मोठ्या प्रमाणात नागरीवस्ती वाढलेली असल्याने यास विरोध करण्यात येत असून, मनपाने येथील निधी हा प्रभागातील इतर विकासकामांसाठी वापरावा तसेच यानंतरही मनपाने स्मशानभूमी दुरुस्तीचे काम हाती घेतल्यास यास विरोध केला जाईल, असे निवेदन भाजपा पक्षाचे नगरसेवक भाग्यश्री ढोमसे व राकेश ढोमसे यांनी नागरिकांनी बरोबर घेत विभागीय अधिकारी सुनीता कुमावत यांना निवेदन दिले होते, तर दुसरीकडे परिसरातील ग्रामस्थांनी शिवसेना नगरसेवक सुधाकर बडगुजर व हर्षा बडगुजर यांना बरोबर घेत याठिकाणी स्मशानभूमीची दुरुस्ती करण्यासाठी साकडे घातल्याने हा वाद चिघळला होता. १९८६ पासून सदरची जागा ही स्मशानभूमीची असल्याने याठिकाणी अंत्यविधीस कोणीही विरोध करू नये, असे ग्रामस्थांच्या वतीने सांगण्यात आले होते. शनिवारी (दि.४) लिंगायत समाजाच्या वतीने अंत्यविधी करण्यासाठी गेले असता स्थानिक नागरिकांनी विरोध दर्शविला. त्यामुळे अंत्यविधीसाठी आलेल्या नागरिकांनी अंबड पोलीस ठाण्यात धाव घेतली. स्मशानभूमी दुरुस्तीचा मार्ग मोकळा मनपाने याठिकाणी स्मशानभूमी दुरुस्तीकामासाठी एक कोटीहून अधिक निधी मंजूर केला असून, गेल्या काही दिवसांपासून याठिकाणी वाद चिघळला असल्याने दुरुस्तीचे काम रखडले होते. आज याठिकाणी लिंगायत समाजाच्या वतीने पोलीस बंदोबस्तात अंत्यविधी केल्याने अखेरीस स्मशानभूमीच्या दुरुस्तीचा मार्ग मोकळा झाला आहे.