शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

त्र्यंबकेश्वर जमीन घोटाळा संशयितांचा अटकपूर्व जामीन फेटाळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2018 01:13 IST

नाशिक : धर्मादाय आयुक्तांची कोणतीही परवानगी न घेता देवस्थानचे विश्वस्त, बिल्डर व महसूल या तिघांनी शासनाची फसवणूक केली असून, यामध्ये आणखी कोण कोण सहभागी आहेत, यासाठी त्र्यंबकेश्वरच्या कोलंबिका देवस्थान जमीन अपहार प्रकरणात गुन्हा दाखल असलेल्या ३५ संशयितांची पोलीस कोठडी आवश्यक असल्याचा जिल्हा सरकारी वकील अजय मिसर यांचा युक्तिवाद तसेच आरोपींच्या वकिलांच्या युक्तिवादानंतर जिल्हा व सत्र न्यायाधीश आऱ आऱ वैष्णव यांनी बुधवारी (दि़ ७) या घोटाळ्यातील आरोपींचा अटकपूर्व जामीन अर्ज नामंजूर केला़

ठळक मुद्देदेवस्थानचे विश्वस्त, बिल्डर व महसूल या तिघांनी शासनाची फसवणूक केली ३५ जणांचा संशयित

नाशिक : धर्मादाय आयुक्तांची कोणतीही परवानगी न घेता देवस्थानचे विश्वस्त, बिल्डर व महसूल या तिघांनी शासनाची फसवणूक केली असून, यामध्ये आणखी कोण कोण सहभागी आहेत, यासाठी त्र्यंबकेश्वरच्या कोलंबिका देवस्थान जमीन अपहार प्रकरणात गुन्हा दाखल असलेल्या ३५ संशयितांची पोलीस कोठडी आवश्यक असल्याचा जिल्हा सरकारी वकील अजय मिसर यांचा युक्तिवाद तसेच आरोपींच्या वकिलांच्या युक्तिवादानंतर जिल्हा व सत्र न्यायाधीश आऱ आऱ वैष्णव यांनी बुधवारी (दि़ ७) या घोटाळ्यातील आरोपींचा अटकपूर्व जामीन अर्ज नामंजूर केला़त्र्यंबकेश्वर येथील कोलंबिका व गंगाद्वार देवस्थान ट्रस्टच्या सुमारे २०० कोटी रुपयांच्या १८५ एकर इनामी जमीन शासन व धर्मदाय आयुक्तांची परवानगी न घेता परस्पर हस्तांतरित केल्याप्रकरणी त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त, बांधकाम व्यावसायिक व महसुली विभागातील तहसीलदार, तलाठी, मंडल अधिकारी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर काही आरोपी फरार तर काहींनी अटकपूर्व जामिनासाठी २७ फेब्रुवारी रोजी जिल्हा न्यायालयात धाव घेतली़ यावर शनिवारी (दि़३ मार्च) जिल्हा सरकारी वकील अजय मिसर व आरोपींच्या वकिलांमध्ये युक्तिवाद झाला होता़ मिसर यांनी आपल्या युक्तिवादात धर्मादाय आयुक्तांची परवानगी नसताना जमिनीवर सातबारा उताºयामध्ये बेकायदेशीरपणे नोंदी करण्यात आल्या तसेच यातील महत्त्वाच्या नोंदीही आरोपींनी गहाळ केल्या असून विश्वस्त, बांधकाम व्यावसायिक व महसूल विभागातील अधिकारी-कर्मचारी यांनी मिळून या जमिनीचा अपहार केल्याचे सांगितले होते़न्यायाधीश वैष्णव यांनी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर बुधवारी सर्व संशयितांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला़त्र्यंबकेश्वरचे तत्कालीन प्रांत रामसिंग सुलाने, तहसीलदार रवींद्र भारदे, मंडळ अधिकारी नंदकिशोर बिरारी व तलाठी बी. एम. हांडोरे, बांधकाम व्यावसायिक सचिन दिनकर दफ्तरी, देवस्थानचे मूळ वहिवाटदार प्रभाकर शंकर महाजन यांच्यासह ३५ जणांचा संशयितात समावेश आहे़