शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

प्लॅस्टिकविरोधी कारवाई थंडावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2018 00:42 IST

महाराष्ट शासनाने राज्यात प्लॅस्टिक बंदी केल्यानंतर महापालिकेने एप्रिलमध्ये सुरू केलेली कारवाई मे महिन्यात मात्र थंडावली आहे. एप्रिल महिन्यात ११० व्यावसायिकांविरुद्ध कारवाई करत सुमारे ५ लाख रुपये दंड वसुली झाली होती. मात्र, मे महिन्यात आतापर्यंत अवघ्या चारच केसेस दाखल असून, २० हजार रुपये दंड वसुली झालेली आहे.

नाशिक : महाराष्ट शासनाने राज्यात प्लॅस्टिक बंदी केल्यानंतर महापालिकेने एप्रिलमध्ये सुरू केलेली कारवाई मे महिन्यात मात्र थंडावली आहे. एप्रिल महिन्यात ११० व्यावसायिकांविरुद्ध कारवाई करत सुमारे ५ लाख रुपये दंड वसुली झाली होती. मात्र, मे महिन्यात आतापर्यंत अवघ्या चारच केसेस दाखल असून, २० हजार रुपये दंड वसुली झालेली आहे. अद्यापही शहरात प्लॅस्टिक पिशव्यांचा सर्रास वापर होताना दिसून येत आहे.  शासनाने प्लॅस्टिक बंदीबाबत शिथिलता आणली असली तरी कारवाई मात्र सुरू ठेवली आहे. महापालिकेने एप्रिल महिन्यात धडक कारवाई करत मोठ्या प्रमाणावर दंडात्मक वसुली केली. एप्रिलमध्ये १०१ विक्रेत्यांवर कारवाई होऊन त्यातून ४ लाख ९४ हजार ५०० रुपये दंड वसूल करण्यात आला. त्यामध्ये पंचवटी विभागातून ६५ हजार, नाशिकरोडला १ लाख २० हजार, पश्चिममध्ये १ लाख १७ हजार ५००, पूर्व विभागात ९७ हजार, सिडकोत ३० हजार, तर सातपूरला ६५ हजार रुपये दंड वसूल झाला आहे. एप्रिल महिन्यात धडक मोहीम राबविणाऱ्या महापालिकेची कारवाई मात्र मे महिन्यात थंडावली आहे. १ ते १६ मे या कालावधीत अवघ्या ४ विक्रेत्यांवर कारवाई होऊन त्यांच्याकडून २० हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे. पंचवटी, पश्चिम, सिडको आणि सातपूर विभागातून प्रत्येकी ५ हजार रुपये दंड वसुली करण्यात आली आहे. दरम्यान, प्लॅस्टिक बंदीबाबत शासनाने मुदतवाढ दिली असली तरी अद्याप शहरात मोठ्या प्रमाणावर प्लॅस्टिकचा वापर सुरूच आहे. काही व्यावसायिकांनी मात्र, कापडी पिशव्यांचा पर्याय पुढे आणला आहे, तर वर्तमानपत्राच्या कागदाचाही वापर केला जाऊ लागला आहे. त्यामुळे रद्दीचेही भाव वाढले आहेत.घनकचरा वर्गीकरण कारवाईमहापालिकेने ओला आणि सुका कचºयाचे वर्गीकरण न करणाºया नागरिक व व्यावसायिकांविरुद्ध कारवाई सुरूच ठेवली आहे. दि. १ ते १२ मे या कालावधीत महापालिकेने ७७ नागरिकांकडून ३८ हजार रुपये, तर १४ व्यावसायिकांकडून १ लाख २ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. घनकचरा वर्गीकरणाबाबत महापालिकेकडून नागरिकांच्या प्रबोधनावरही भर दिला जात आहे. दरम्यान, कारवाई टाळण्यासाठी नागरिक व व्यावसायिकांनी वर्गीकृत कचराच घंटागाड्यांमध्ये टाकावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

टॅग्स :Plastic banप्लॅस्टिक बंदी