शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

नाशकात करवाढीच्या निषेधार्थ भाजपाविरोधक रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2018 19:21 IST

कॉँग्रेसचे उद्या धरणे : माकपने केली निदर्शने, राष्ट्रवादीचे उद्यापासून मोर्चे

ठळक मुद्देमहापालिकेने घरपट्टीत केलेल्या जबर वाढीचे पडसाद विरोधकांनी या करवाढीविरोधात सत्ताधारी भाजपावर टीकास्त्र सोडले आहे

नाशिक - महापालिकेने घरपट्टीत केलेल्या जबर वाढीचे पडसाद आता उमटू लागले असून राष्ट्रवादी कॉँग्रेसने शुक्रवार (दि.२३) पासून सहाही विभागांवर मोर्चे नेण्याचे नियोजन केले आहे तर शहर कॉँग्रेसच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले जाणार आहे. दरम्यान, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्यावतीने गुरुवारी (दि.२२) महापालिका मुख्यालयासमोर निदर्शने करत सत्ताधारी भाजपाचा निषेध केला. विरोधकांनी या करवाढीविरोधात सत्ताधारी भाजपावर टीकास्त्र सोडले आहे.मंगळवारी (दि.२०)झालेल्या महासभेत मिळकत करामध्ये ३३ ते ८२ टक्क्यांपर्यंत दरवाढ करण्यास मंजुरी देण्यात आली. या करवाढीच्या निषेधार्थ विरोधकांनी सभात्याग करत सत्ताधारी भाजपाविरोधी घोषणाबाजी केली होती. त्यानंतर, भारतीय विद्यार्थी सेनेने महापौरांच्या ‘रामायण’ निवासस्थानासमोर घरपट्टीची होळी करत करवाढीचा निषेध नोंदविला होता. आता  राष्ट्रवादी कॉँग्रेसने शुक्रवार (दि.२३) पासून महापालिकेच्या सहाही विभागीय कार्यालयांवर मोर्चे नेण्याचे नियोजन केले आहे. याबाबत झालेल्या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांनी सांगितले, या करवाढीमुळे बालकाच्या खिशावरच पालकाकडून डल्ला मारण्याचा प्रकार घडत असून शुक्रवारी (दि.२३) नाशिकरोड येथे बिटको पार्इंटवरून विभागीय कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. त्यानंतर, दि. २७ फेबु्रवारीला नाशिक पूर्व, दि. २८ फेबु्रवारीला सिडको, दि. १ मार्च रोजी पंचवटी, दि. २ मार्च रोजी नाशिक पश्चिम आणि दि. ३ मार्च रोजी सातपूर विभागीय कार्यालयावर मोर्चे नेण्यात येणार आहेत. त्यानंतर महापालिका मुख्यालयावर हल्लाबोल मोर्चा काढण्यात येणार आहे. यावेळी, राष्ट्रवादीचे गटनेता गजानन शेलार, निवृत्ती अरिंगळे, संजय खैरनार, नगरसेवक सुषमा पगारे, समीना मेमन, मकरंद सोमवंशी, किशोर शिरसाठ, अमोल वाजे, मुजाहित शेख, शंकर मोकळ आदी विभागीय अध्यक्ष उपस्थित होते. राष्ट्रवादीबरोबरच शहर कॉँग्रेसच्यावतीने करवाढीच्या निषेधार्थ शुक्रवारी (दि.२३) सकाळी ११ ते १ या वेळेत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले जाणार असल्याचे शहराध्यक्ष शरद अहेर यांनी कळविले आहे. दरम्यान, गुरुवारी महापालिकेच्या मुख्यालयासमोर माकपच्यावतीने करवाढीच्या निषेधार्थ जोरदार निदर्शने करण्यात आली. या करवाढीने सामान्य माणसाला मोठा फटका बसणार असल्याचे सांगत सदर करवाढ त्वरित मागे घेण्याची मागणी केली आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाTaxकर