नाशिक : शहरात खंडणी आणि त्यातून होणार्या गुन्ांचे प्रमाण वाढले असतानाच आज सरकारवाडा पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी तिघांना ताब्यात घेतले आहे.याबाबत हरीश गांगुर्डे याने फिर्याद दिली असून, त्यात म्हटले आहे की, गणेश चांगले, सागर पवार, महेश सावंत व इतर तिघांनी ९ मे रोजी आपल्याकडे पाच लाख रुपयांची खंडणी मागितली होती. या तक्रारीवरून सरकारवाडा पोलिसांनी सचिन जगताप, महेश सावंत व सागर पवार या तिघांना ताब्यात घेतले असून, रात्री उशिरापर्यंत त्यांच्यावर गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.
खंडणीचा आणखी एक गुन्हा दाखल
By admin | Updated: May 14, 2014 23:50 IST