शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

जुन्या नाशकात कोरोनामुळे आणखी एका वृद्धाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2020 00:29 IST

शहरात कोरोनाबाधितांच्या संख्येने सहाशेचा टप्पा पार केल्यानंतरदेखील ही संख्या वाढतच आहे. परंतु त्यापेक्षा दाट वस्तीच्या भागात मृत्यू पावणाऱ्यांची संख्या वाढतच आहे. शनिवारी (दि.१३) जुन्या नाशकात दोन जणांचे मृत्यू झाल्यानंतर रविवारी (दि.१४) आणखी एका बाधिताचा मृत्यू झाला. त्यामुळे शहरातील कोरोना बळींची संख्या ३२ झाली आहे, तर ५९ बाधित आढळल्याने एकूण बाधितांची संख्या ६७३ झाली आहे.

ठळक मुद्देबळींची एकूण संख्या ३२ : दिवसभरात आढळले ५९ बाधित

नाशिक : शहरात कोरोनाबाधितांच्या संख्येने सहाशेचा टप्पा पार केल्यानंतरदेखील ही संख्या वाढतच आहे. परंतु त्यापेक्षा दाट वस्तीच्या भागात मृत्यू पावणाऱ्यांची संख्या वाढतच आहे. शनिवारी (दि.१३) जुन्या नाशकात दोन जणांचे मृत्यू झाल्यानंतर रविवारी (दि.१४) आणखी एका बाधिताचा मृत्यू झाला. त्यामुळे शहरातील कोरोना बळींची संख्या ३२ झाली आहे, तर ५९ बाधित आढळल्याने एकूण बाधितांची संख्या ६७३ झाली आहे.नाशिक शहरात कोरोनाबाधिताच्या वाढत्या संख्येने जुने नाशिक आणि वडाळा भाग हॉटस्पॉट तर झाला आहेच, परंतु आता डेथ स्पॉटदेखील झाला आहे. या भागात आत्तापर्यंत १९ जणांचे मृत्यू झाले आहेत. परंतु यानंतरदेखील मृतांची संख्या वाढतच आहे. रविवारी (दि.१४) चौक मंडई येथील एका बाधिताचा कोरोनामुळे मृत्यू झाला. या ६७ वर्षीय वृद्धाला ११ जून रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या वृद्धाच्या मृत्यूनंतर त्याचा कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. दरम्यान, पखालरोड भागातील ३० वर्षीय युवकाचा अहवालदेखील पॉझिटिव्ह आला असून, त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर दुसरीकडे पखालरोड येथील सात वर्षीय मुलीला कोरोना संसर्ग झाला आहे. नाईकवाडी पुरा येथे पुन्हा एक रुग्ण आढळला आहे. त्यावर डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गुरुद्वारारोडवरील नऊ वर्षांच्या मुलाला संसर्ग झाला असून, भाभानगर येथेही एक रुग्ण आढळला आहे. वडाळागाव येथील ६० वर्षीय वृद्ध पुरुष आणि त्याच कुटुंबातील ५८ वर्षीय महिला कोरोनाबाधित असल्याचे आढळले आहे.गेल्या काही दिवसांत वडाळा येथील बाधित आढळणे थांबले होते. मात्र आता पुन्हा तेथे दोन रुग्ण आढळले आहेत, तर दुसरीकडे सिडकोतील कामटवाडे भागात ४६ वर्षीय आणि पंचवटीत हिरावाडीत ३५ वर्षीय पुरुषाला संसर्ग झाला आहे.

टॅग्स :Nashikनाशिकcorona virusकोरोना वायरस बातम्या