शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का; एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या

By श्याम बागुल | Updated: September 10, 2022 15:37 IST

नाशिकला उदय किसवे : नऊ अधिकाऱ्यांची सेवा महसूलकडे वर्ग 

नाशिक : राज्यातील सत्तांतरानंतर उद्धव ठाकरे सरकारमध्ये महत्वाच्या महामंडळे तसेच विविध मंत्रालयात वरिष्ठ पातळीवर काम करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा सपाटा सुरू झाला आहे. त्यातूनच माजी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी नियुक्ती केलेल्या राज्यातील औद्योगिक विकास महामंडळातील नऊ प्रादेशिक अधिकाऱ्यांची सेवा महसूल विभागाकडे वर्ग करून त्यांच्या जागी नवीन अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.

या बदल्यांची त्याची अधिकृत ऑर्डर जाहीर करण्यात आली नाही नवीन नियुक्तीमध्ये नाशिकच्या प्रादेशिक अधिकारीपदी उदय किसवे यांची नियुक्ती करण्यात येवून नितीन गवळी यांची उचलबांगडी झाली आहे. या संदर्भात गुरूवारी (दि.८) रोजी उशीरा उद्योग विभागाने आदेश काढले आहेत.

त्यात औरंगाबादचे राजेश जोशी, नाशिकचे नितीन गवळी, पुण्याचे प्रवीण ठाकरे, पनवेलचे रविंद्र बोंबले, महापे येथील सतिष बागल, ठाण्याचे विजयसिंह पाटील, औद्योगिक विकास महमंडळातील उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय काटकर, संजय मोरे, फरोज मुकादम या नऊ प्रादेशिक अधिकाऱ्यांची सेवा मूळ महसूल विभागाकडे वर्ग करण्यात आली. त्याच बरोबर २० अधिकाऱ्यांच्या नव्याने नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. त्यात नाशिकच्या औद्योगिक विकास महामंडळाचे प्रादेशिक अधिकारीपदी उदय किसवे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 

टॅग्स :MIDCएमआयडीसीUddhav Thackerayउद्धव ठाकरे