-मनोज मालपाणी
नाशिक- शिवसेनेचे उपनेते व 25 वर्ष आमदार राहिलेले बबनराव तथा नाना घोलप यांनी अखेर आज सकाळी आपल्या शिवसैनिक पदाचा राजीनामा देत शिवसेनाला (ठाकरे गट) जय महाराष्ट्र केला. गेल्या अनेक दिवसापासून घोलप हे शिवसेनेला सोडचिठ्ठी देतील या चर्चेला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. मात्र अद्याप त्यांनी कुठल्या पक्षात जाणार हे जाहीर केलेले नाही.
याबाबत लोकमतशी बोलताना घोलप यांनी सांगितले की, मी आज माझ्या शिवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्व पदाचा राजीनामा देत आहे. कारण आजपर्यंत शिवसैनिक म्हणुन मी निष्ठेने व ईमाने ईतबारे काम केले आहे. मला पक्षाने जे जे सांगितले, ते प्रामाणीकपणे केले आहे. पण अचानकपणे शिर्डी लोकसभा संपर्कप्रमुख पदावरुन वरुन मला काढुन मला अपमानीत करण्यात आले आले. मी ज्यांना निष्क्रीय पदाधीकारी म्हणून काढुन टाकले होते व नविन पदाधीकारी नेमले होते. त्यांना ही बदलण्यात आले, हे कितपत बरे आहे.
विशेष म्हणजे ज्या सहा विधानसभा संपर्क प्रमुखांनी लेखी कळवले होते, की हे जुने पदाधीकारी कसे बिनकामाचे विकाऊ आहेत. ते लक्षात येऊन सुध्दा त्यांना परत घेऊन पद दिली हे सर्व पाहुन मी अचंबित आहे.नेमक माझं काय चुकल ते समजल नाही. मी याबाबत दादही मागीतली पण काहीच ऊत्तर मिळाल नाही. माझे वकीली करणारेही गप्प आहे. त्यापेक्षा आपण थाबुंन घेणे महत्वाचे वाटते. म्हणुन मी माझा शिवसैनीक पदाचा राजीनामा देत आहे असे घोलप यांनी स्पष्ट केले.