शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
6
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
7
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
8
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
9
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
10
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
11
जीएसबी सेवा मंडळाचा ४७४ कोटींचा विमा; यामध्ये भाविकांचाही समावेश, एसीमध्ये दर्शन मिळणार
12
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
13
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
14
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
15
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
16
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
17
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

येवला बाजार समितीची वार्षिक सभा

By admin | Updated: September 30, 2016 23:33 IST

चार महत्त्वपूर्ण ठराव संमत : अंदरसूल उपबाजार आवारात कार्यालयाची मागणी

येवला : कृषी उत्पन्न बाजार समितीची १३वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. अध्यक्षस्थानी सभापती उषाताई शिंदे होत्या.प्रारंभी गेल्या वर्षभरातील दिवंगत नामवंतांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. अतिथींच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. बाजार समितीचे सचिव डी.सी.खैरनार यांनी प्रास्ताविकात बाजार समितीच्या वार्षिक कामकाजाचा आढावा घेतला. अंदरसूल उपबाजार आवारात कार्यालय व कम्पाउण्ड या सुविधा उपलब्ध करून द्याव्या, अशी मागणी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राधाकिसन सोनवणे यांनी केली.येवला व मनमाडच्या केंद्रस्थानी असणाऱ्या राजापूरला नवीन उपबाजार समिती सुरू करावी, अशी मागणी सरपंच प्रमोद बोडके यांनी करून येवला व अंदरसूल मार्केट कमिटीत संचालक व कर्मचारी यांच्या कामामुळे त्याच्या अभिनंदनाचा ठराव मांडला. शेतकरी संघटना नेते संतू पाटील झांबरे यांनी शासनावर टीकेची झोड उठवत नियमन मुक्तीच्या धोरणात शासनाने शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडल्याचा आरोप केला. संचालक भास्कर कोंढरे यांनी शासनाला घरचा अहेर देत, धरसोडीच्या धोरणाने शेतकरी भरडला जात असल्याचा आरोप केला. यावेळी बाजार समिती संचालक मकरंद सोनवणे, साहेबराव सैद यांची भाषणे झाली.बाजार समितीत चार कोटी ८१ लाखांची कामे यंदाच्या वर्षात हाती घेतली असल्याची माहिती दिली. पक्षाचे जोडे बाहेर ठेवून पारदर्शी पद्धतीने चालणाऱ्या कामास सहकार्य करणाऱ्या संचालक मंडळ व कर्मचारी आणि शेतकरी यांना धन्यवाद दिले. शासनाच्या म्हणण्याप्रमाणे ज्या शेतकऱ्यांनी बाजार समिती बाहेर विकला त्या शेतकऱ्याच्या अनुदानाचे काय, असा सवालही सभापती उषाताई शिंदे यांनी उपस्थित केला. सूत्रसंचलन डी. सी. खैरनार यांनी केले तर आभार उपसभापती गणपत कांदळकर यांनी मानले. या सभेस मविप्र संचालक अंबादास बनकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राधाकिसन सोनवणे, नगराध्यक्ष प्रदीप सोनवणे, बाळासाहेब लोखंडे, बी.आर लोंढे, राजेंद्र गायकवाड, सहाय्यक निबंधक जितेंद्र शेळके यांच्यासह कृउबा संचालक संजय बनकर, नवनाथ काळे, अशोक मेंगाणे, मोहन शेलार, मकरंद सोनवणे, भास्कर कोंढरे, कांतीलाल साळवे, साहेबराव सैद, गोरख सुरासे, देवीदास शेळके, राधाबाई गायकवाड उपस्थित होते. सभेच्या नियोजनासाठी बाजार समितीचे सचिव डी.सी. खैरनार, कर्मचारी कैलास व्यापारे, बंडू अहेर, संजय ठोक, रवींद्र बोडके, अनिल कांगणे, सिद्धेश्वर जाधव उपस्थित होते. (वार्ताहर)