नाशिकरोड : नेहरूनगर येथील केंद्रीय विद्यालयाचा वार्षिक कलामहोत्सव व पारितोषिक वितरण सोहळा नुकताच उत्साहात पार पडला. ‘वार्षिक महोत्सव २०१६’ च्या उद्घाटन सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस आयुक्त एस. जगन्नाथन तसेच भारत प्रतिभूती मुद्रणालयाचे महाप्रबंधक आर. हरीपंत व उषा हरीपंत उपस्थित होते. यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते वर्षभरात विविध स्पर्धांतील विजेत्या व विद्यार्थ्यांसाठी नाशिक-पुणे महामार्गावर दररोज सकाळी वाहतूक नियंत्रण करणाऱ्या ११ पालकांचा सत्कार करण्यात आला. तसेच शिक्षक सुनील परदेशी, श्रीमती एस. डेबनाथ, नीलिमा दीक्षित, शुभांगी नेने व दिलीप सोनार यांना के.वी.एस. मुंबई विभागातर्फे विशेष प्रोत्साहन पुरस्कार मिळाल्याबद्दल व जपान येथे शैक्षणिक कार्यक्रमात सहभागी झालेल्या तीन विद्यार्थ्यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक प्राचार्य आर. एस. उलाडी व अहवाल वाचन किरण द्विवेदी यांनी केले. आभार सुनील परदेशी यांनी मानले. यावेळी बी. के. चौधरी, राजेश पाठक, शुभांगी नेने, उपासना पवार, नजमा सय्यद, शंकर सोनुले, श्रेया कुमारी आदिंसह विद्यार्थी, पालक, शिक्षक, कर्मचारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
केंद्रीय विद्यालयात वार्षिक कलामहोत्सव
By admin | Updated: May 5, 2016 00:42 IST