शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

निवडीची तहकूब सभा वादात?

By admin | Updated: November 6, 2014 00:20 IST

प्रशासनाची बघ्याची, तर कर्मचाऱ्यांची लुडबुडीची भूमिकाही चर्चेत

नाशिक : जिल्हा परिषदेच्या विषय समित्यांचे वाटप व विषय समित्यांवर रिक्त पदांसाठी बोलावलेली विशेष सभा तहकूब करण्याची नामुष्की अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर पहिलीच सभा असलेल्या विजयश्री चुंबळे यांच्यावर आली; शिवाय अध्यक्षांनी जाहीर केलेल्या विषय समिती वाटपावरही काही सदस्यांनी आक्षेप घेतला असून, त्याबाबत विभागीय आयुक्तांकडे दाद मागण्याची तयारी सुरू केली आहे.मुळातच ही विशेष सभा सहा विषय समित्यांचे वाटप तीन पदाधिकाऱ्यांना देण्याबरोबरच रिक्त असलेल्या विविध विषय समित्यांच्या २३ जागांसाठी सदस्यांची निवड करण्यासाठी बोलावण्यात आली होती. त्यामुळे एकापेक्षा जास्त संख्या असल्यास निवडणुकीने ही पदे वाटप करावीत असे महाराष्ट्र जिल्हा परिषद अधिनियम १९६४ च्या कलमांमध्ये नमूद केले आहे; शिवाय निवडणूक बिनविरोध असेल तर त्याची घोषणा अध्यासन अधिकारी म्हणून जिल्हा परिषद अध्यक्ष करू शकतात, असेही या नियमात म्हटले आहे. स्थायी समितीच्या दोन जागांसाठी शैलेश सूर्यवंशी, बाळासाहेब गुंड, संगीता ढगे व मनीषा बोडके यांचे चार अर्ज दाखल करण्यात आले होते. पैकी मनीषा बोडके यांनी अर्ज माघारीची तयारी दर्शविली होती; मात्र राष्ट्रवादीतील तीनपैकी कोणीही माघार घेण्यास तयार नसल्याने अन्य सर्वच समित्यांच्या रिक्त पदांवरील निवड रखडली. त्यामुळे या समित्यांवर निवड करण्यासाठी गोळा केलेले अर्ज आता तसेच असून, पुढील बैठकीत त्याचा फैसला होण्याची शक्यता आहे. मात्र अशी सभा तहकूब करता येते काय यावर प्रशासनाने कोणतीही सभा तहकूब करता येते असे स्पष्ट केले असले, तरी विषय समित्यांचे वाटप करताना सूचक व अनुमोदक कोण, सर्वसंमतीने ही निवड झाली काय, मग अध्यक्षांनी अचानक जाहीर केलेल्या विषय समित्यांच्या वाटपाचीही पुनर्निवडणूक होणार काय यांसह अनेक प्रश्न आता सदस्य विभागीय आयुक्तांना देण्यात येणाऱ्या अर्जात करणार असल्याचे कळते. (प्रतिनिधी)