शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

अध्यक्षपदाची घोषणाही नाशिकमध्येच !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 01:14 IST

नाशिकला होणाऱ्या ९४ व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी राज्यातील महामंडळाच्या सर्व संस्था जी नावे सुचवतील, त्या सर्व नावांबाबत २३ जानेवारीला नाशिकमध्ये महामंडळाच्या बैठकीत चर्चा होईल. त्यानंतर निवडीची घोषणा नाशिकमध्येच २४ जानेवारीला अधिकृतरित्या करण्यात येणार आहे. 

ठळक मुद्देनाट्यसंमेलन : २३ जानेवारीला होणाऱ्या बैठकीत निवडीवर चर्चा

नाशिक :  नाशिकला होणाऱ्या ९४ व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी राज्यातील महामंडळाच्या सर्व संस्था जी नावे सुचवतील, त्या सर्व नावांबाबत २३ जानेवारीला नाशिकमध्ये महामंडळाच्या बैठकीत चर्चा होईल. त्यानंतर निवडीची घोषणा नाशिकमध्येच २४ जानेवारीला अधिकृतरित्या करण्यात येणार आहे. दरवर्षी संमेलनाध्यक्ष निवडीची विशिष्ट प्रक्रिया साहित्य महामंडळाने निश्चित केली आहे. त्यात माजी संमेलनाध्यक्ष यांच्याकडून एक नाव सुचवले जाते, तर नाशिकच्या निमंत्रक संस्थेकडूनदेखील एक नाव सुचवले जाते. त्याशिवाय महामंडळाच्या देशभरातील १० संस्थांकडून संमेलनाध्यक्ष निवडीबाबत त्या भागातील ज्येष्ठ साहित्यिकाच्या नावाची निवड करण्यात येते. ही सर्व नावे विशिष्ट कालावधीत बंद लिफाफ्यातून महामंडळाकडे येत असतात. या सर्व संस्था वेगवेगळी नावे सुचवू शकतात किंवा काही संस्था सारखीच नावे सुचवू शकतात. या सर्व नावांचे लिफाफे साहित्य महामंडळाच्या बैठकीत सर्वांसमक्ष उघडले जातात. हीच महामंडळाची निर्धारित पद्धत असल्याचे अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी सांगितले. या पद्धतीनुसारच यंदादेखील महामंडळाच्या सर्व विभागीय शाखांकडून नावे मागविण्यात आलेली आहेत. ती नावे २१ तारखेपर्यंत नाशिकला पोहोचतील. त्यानंतर २३ तारखेला साहित्य महामंडळाची बैठक होणार असून त्यात सर्व नावांवर प्रदीर्घ चर्चा करण्यात येईल. त्यातून सर्वोत्तम साहित्यिकाच्या नावाची निवड करून त्याची घोषणा नाशिकमध्येच करण्यात येणार असल्याचेही ठाले पाटील यांनी सांगितले. ऐनवेळी कलाटणीचीही परंपरा साहित्य संमेलनांच्या अध्यक्षपदांबाबत ज्या नावांची चर्चा होते, तसेच जी नावे प्रचंड चर्चेत असतात त्या नावांचा केवळ उल्लेख करून त्याकडे दुर्लक्ष केले जाण्याचीदेखील महामंडळाची परंपरा आहे. त्यामुळे जे नाव एखाद्याच विभागीय कार्यालयाने सुचविलेले असते, त्याच नावावर शिक्कामोर्तब केले जाते किंवा निमंत्रक संस्थेने सुचविलेल्या नावावरही पसंतीची मोहोर उठविली जाते. त्यामुळे यंदाच्या साहित्य संमेलनात महामंडळ चर्चेतील नावाला पसंती देते की, सोयीस्कर कलाटणीची परंपरा पाळली जाते, हे पाहणेदेखील औत्सुक्याचा विषय ठरणार आहे.  

टॅग्स :Nashikनाशिकcultureसांस्कृतिकliteratureसाहित्य