शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

ज्येष्ठांच्या पुनर्मैत्रीचा वर्धापनदिन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2019 00:36 IST

महाविद्यालय सोडून तशी चाळीस वर्षेे लोटली. परंतु जिवाचे मैत्र शांत बसू देईनात. मित्रांच्या ओढीने सर्वांची एकदा भेट झाली आणि मग दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी सर्वजण भेटू लागली. पुन्हा मैत्री फुलली. वयानुरूप सामाजिक जाणीव वाढली आणि आता सामाजिक कार्यदेखील होऊ लागले. पुनर्मैत्रीचे बंध जुळण्याचा तिसरा वर्धापनदिन सोहळा नाशिकरोडच्या लेस्ली सोनी सेंटरमध्ये साजरा झाला आणि १९७४ मधील बीवायकेतील माजी विद्यार्थ्यांनी आठवणी जागवल्या.

नाशिक : महाविद्यालय सोडून तशी चाळीस वर्षेे लोटली. परंतु जिवाचे मैत्र शांत बसू देईनात. मित्रांच्या ओढीने सर्वांची एकदा भेट झाली आणि मग दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी सर्वजण भेटू लागली. पुन्हा मैत्री फुलली. वयानुरूप सामाजिक जाणीव वाढली आणि आता सामाजिक कार्यदेखील होऊ लागले. पुनर्मैत्रीचे बंध जुळण्याचा तिसरा वर्धापनदिन सोहळा नाशिकरोडच्या लेस्ली सोनी सेंटरमध्ये साजरा झाला आणि १९७४ मधील बीवायकेतील माजी विद्यार्थ्यांनी आठवणी जागवल्या.१९७४ मध्ये महाविद्यालयात असलेली आता, तर ही सर्व ज्येष्ठ मंडळीच आहेत, परंतु प्रपंचातून आणि संसारातून थोडी उसंत मिळू लागली आणि पुन्हा एकदा कॉलेजमधील सुखद दिवस, मित्र, मैत्रिणी आठवायला लागले. यातूनच कॉलेजमधील मित्रांना एकत्र आणण्यासाठी संकल्पना श्रीपाद गलगले यांनी मांडली आणि त्याला इतर मित्रांनी होकार भरल्यानंतर जुन्या मित्रांचा शोध घेण्यात आला. त्यानंतर माजी विद्यार्थ्यांचा एक मेळावा पार पडला. यावेळी स्वानंद बेदरकर यांचे व्याख्यान आयोजित केले होते. त्यानंतर भगूर येथील सावरकर स्मारकास भेट देण्यात आली. माजी सहायक पोलीस आयुक्त मंडलेश्वर काळे, राजेंद्र ब्रह्मेचा, उल्हास जोगळेकर, गुरुमेलसिंग फनफेर, सोमनाथ जाजू, अनिल सुकणेकर आदींसह अन्य मान्यवर यावेळी सहभागी झाले होते.

टॅग्स :Nashikनाशिकcollegeमहाविद्यालय