शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

अण्णा भाऊ साठे जन्मशताब्दीनिमित्त मॉस्कोत भरणार साहित्य संमेलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2017 00:13 IST

सामान्य माणसाची उर्मी जागी व्हावी व त्यांनी समाजासाठी सक्रिय योगदान द्यावे यासाठी जीवन कार्य व्यतित करणाºया लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त रशियातील मॉस्को येथे दि. १ व २ आॅगस्ट २०२० रोजी साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णा भाऊ साठे साहित्य सांस्कृ तिक संमेलन सातारा येथील क्रांती थिएटर्ससह विविध संस्थांच्या माध्यमातून घेण्यात येणार आहे.

नाशिक : सामान्य माणसाची उर्मी जागी व्हावी व त्यांनी समाजासाठी सक्रिय योगदान द्यावे यासाठी जीवन कार्य व्यतित करणाºया लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त रशियातील मॉस्को येथे दि. १ व २ आॅगस्ट २०२० रोजी साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णा भाऊ साठे साहित्य सांस्कृ तिक संमेलन सातारा येथील क्रांती थिएटर्ससह विविध संस्थांच्या माध्यमातून घेण्यात येणार आहे. नाशिक विभागीय कार्यकारिणीची निवडही करण्यात आल्याची माहिती संयोजन समितीचे कार्याध्यक्ष अमर गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत दिली.  अण्णा भाऊ साठे यांनी शोषणविरोधी व समाजवादी विचारांचा स्वीकार करून लोककलेद्वारे मानवी जीवनामध्ये सांस्कृतिक जीवन फुलविताना समाज मनाचा समन्वय बांधण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या साहित्याला व विचारांना आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचविण्यासाठीच आंतरराष्ट्रीय संमेलनाचे आयोजन करण्यात आल्याचे संयोजकांनी सांगितले. या संमेलनासाठी उपस्थित राहू इच्छिणाºया समाजबांधवांनी स्वखर्चाने संमेलनाला उपस्थित राहण्याचे अवाहन करण्यात आले असून, संमेलनासाठी जवळपास तीन हजार साहित्य रसिक उपस्थित राहण्याचा अंदाज संयोजकांनी व्यक्त केला आहे. साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णा भाऊ साठे साहित्य सांस्कृतिक संमेलनासाठी नाशिक विभागीय कार्यकारिणीची निवड करण्यात आली असून, कार्यकारिणी अध्यक्षपदी उत्तम अहिरे यांची निवड करण्यात आली आहे. यावेळी अध्यक्ष भगवान अवघडे, कोषाध्यक्ष श्रीनिवास डोंगरे, सचिव शशीकांत गाडे, उत्तम, अहिरे, बाळासाहेब शिरसाठ, संपादक मंडळाचे प्रमुख कवी सुभाष पवार, विश्वास कांबळे, सुभाष पवार, डॉ. पितांबर जाधव, दिनकर लांडगे, रामराव पारधे, शांताराम पगारे, शाहीर विजय थोरात, गणेश जाधव, दिलीप साठे, अशोक साठे उपस्थित होते.लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना सामाजिक कार्य व साहित्यासाठी भारतरत्न पुरस्कार व ज्ञानपीठ पुरस्कार देण्यात यावा, अशी मागणी संमेलनाच्या आयोजकांनी केली आहे. तसेच अण्णा भाऊंच्या सांगलीतील वाटेगाव येथील जन्मगावी राष्ट्रीय लोककला आंतरराष्ट्रीय विद्यापीठाची स्थापना करण्यात यावी, विद्यापीठांमध्ये साठे अध्यासन केंद्र सुरू करावे, अशा विविध मागण्या संयोजन समितीच्या वतीने करण्यात आल्या आहेत.