नाशिक : ‘जग बदल घालुनी घाव, सांगून गेले मला भीमराव’ अशी क्रांतीची घोषणा करणारे आणि वास्तवाचे चित्रण करणारे परिवर्तनवादी साहित्यिक तथा लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंती उत्सवानिमित्त सोमवारी शहरातून मिरवणूक काढण्यात आली. महात्मा फुले चौकापासून संध्याकाळी पाच वाजता भर पावसात मिरवणुकीला सुरुवात झाली. याप्रसंगी महापौर अशोक मुर्तडक, पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील, सहायक आयुक्त राजू भुजबळ, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोमनाथ तांबे, अण्णा भाऊ साठे फाउंडेशनचे सुभाष भुजबळ, हनिफ बशीर, बबलू पठाण, भाजपच्या अनुसूचित मोर्चाचे संजय गालफाडे, मनोज चंदनशिव, एकनाथ खंडाळे, दिगंबर मोगरे, सरला वाकळे, मनोज मकाळे आदि उपस्थित होते.
शहरात अण्णा भाऊ साठे मिरवणूक
By admin | Updated: August 2, 2016 02:13 IST