लोकमत न्यूज नेटवर्ककळवण : महाराष्ट्रातील शेतकरी आपल्या न्याय हक्कासाठी संपावर गेला असून, या संपाची भूमिका शेतकरी नेते ठरवतील. समाजसेवक अण्णा हजारे यांनी शेतकरी संपात लुडबुड करू नये. हजारे यांनी आराम करावा, असा सल्ला शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष देवीदास पवार यांनी हजारे यांना दिला. अण्णा हजारे यांनी शेतकरी संपाला पाठिंबा दिला पण सक्रि य सहभाग नाही असे पत्रकाद्वारे कळविले आहे. भाजपा सरकार सत्तेवर आणण्यासाठी जिवाचे रान केले. अर्थहीन आंदोलने करून दिल्ली हलवली. तशाच पद्धतीच्या आंदोलनाची अपेक्षा शेतकरी बांधवांना होती. मात्र तीन वर्षांपासून समाजसेवक अण्णा हजारे मूग गिळून बसले आहेत. शेतकऱ्यांचा संप सुरु झाल्याने व शेतकऱ्यांना मुर्खात काढायचे सरकारचे सर्व प्रयत्न संपल्याने भाजपा सरकारने नवीन कार्ड खेळत अण्णा हजारे यांच्या नावाचे कार्ड बाहेर काढले आहे . या शेतकरी संपात हजारे यांची मध्यस्थी नको असून, हजारे यांनी आराम करावा, असा सल्ला देवीदास पवार यांनी दिला आहे.
अण्णा हजारे यांनी संपात लुडबुड करू नये
By admin | Updated: June 3, 2017 00:50 IST