मालेगाव : तालुक्यातील डाबली येथे शेळ्या व मोठ्या जनावरांच्या लसीकरणाचे शिबिर झाले. त्यात जवळपास ५०० जनावरांचे लसीकरण करण्यात आले. तालुक्यातील वडेल येथील कृषी विज्ञान केंद्र व अजंग येथील पशुवैद्यकीय दवाखान श्रेणी क्रमांक दोन यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर आयोजित करण्यात आले. प्रारंभी पशुविज्ञान व दुग्धशास्त्र विशेतज्ज्ञ संदीप नेरकर यांनी शेळ्यांमधील आंत्रविषार या रोगासंबंधी व मोठ्या जनावरांमधील फऱ्या व घटसर्प या रोगासंबंधी माहिती, ओळख व प्रतिबंधात्मक उपाय या संदर्भात मार्गदर्शन केले. अजंग पशुवैद्यकीय दवाखान्याचे पशुधन विकास अधिकारी डॉ. आर. के. देवरे यांनी शेळ्या, मेंढ्या, गायी व म्हशी यामधील वेगवेगळ्या रोगांसंदर्भात मार्गदर्शन केले. शिबिरांतर्गत प्रथम गावातील जास्तीत जास्त शेळ्यांचे लसीकरण करण्यात आले. त्यानंतर मोठ्या जनावरांचे लसीकरण झाले. यावेळी सरपंच स्वाती ढगे, सतीश ढगे, तुकाराम निकम, दादाजी बच्छाव, अशोक बच्छाव, संजय देवरे आदिंसह पशुपालक उपस्थित होते. प्रास्ताविक कृषी विज्ञान केंद्राचे प्रभारी समन्वयक अमित पाटील यांनी केले. यावेळी कृषी विज्ञान केंद्राचे रुपेश खेडकर, पवन चौधरी, विजय शिंदे, महेंद्र पवार यांच्यासह पशुपालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)
कृषी विज्ञान केंद्रातर्फे पशू लसीकरण शिबिर
By admin | Updated: August 30, 2015 22:01 IST