शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

पशुसंवर्धन विभागामुळे शेतकऱ्यांच्या संतापात भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2019 00:08 IST

भास्कर सोनवणे घोटी : इगतपुरी पशुसंवर्धन विभागाने तालुक्यात कोठेही चारा टंचाई नसल्याचा निर्वाळा दिला आहे. तालुक्याच्या कानाकोपºयात तीव्र चारा टंचाई असतानाही ८२ हजार टन चारा उपलब्ध आहे. हा चारा अजून ४ महिने पुरेल अशी शक्यताही व्यक्त केली आहे. प्रत्यक्षात परीस्थिती वेगळी असल्याने शेतकऱ्यांनी या कारभारबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

ठळक मुद्देइगतपुरी : चारा टंचाई असतांना ४ महिने पुरेल असा अहवाल दिला

भास्कर सोनवणेघोटी : इगतपुरी पशुसंवर्धन विभागाने तालुक्यात कोठेही चारा टंचाई नसल्याचा निर्वाळा दिला आहे. तालुक्याच्या कानाकोपºयात तीव्र चारा टंचाई असतानाही ८२ हजार टन चारा उपलब्ध आहे. हा चारा अजून ४ महिने पुरेल अशी शक्यताही व्यक्त केली आहे. प्रत्यक्षात परीस्थिती वेगळी असल्याने शेतकऱ्यांनी या कारभारबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.गवत आणि चाºयासाठी नागरिक इतर तालुक्यात वणवण फिरत असतांना पशुसंवर्धन विभागाने दिलेल्या आकडेवारीमुळे लोकांच्या संतापात भर पाडली आहे.इगतपुरी तालुक्यात ह्या वर्षी जनावरांसह माणसांनाही तीव्र दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. पाणी आणि चाºयाअभावी जनावरांचे मृत्यू होत आहेत. घोटीच्या बाजार समितीत मातीमोल किमतीत जनावरे विकायला येत आहेत. अशा भयानक स्थितीत पशुधन धोक्यात असूनही पंचायत समितीच्या पशुसंवर्धन विभागाची असंवेदनशीलता समोर आली आहे.तालुक्यात मोठी जनावरे ६२ हजार ९०८ तर लहान जनावरे ४ हजार ६९९ आहेत. ह्या सर्व जनावरांसाठी सद्यस्थितीत ८२ हजार टन चारा तालुक्यात शिल्लक आहे. येत्या सप्टेंबर महिनाअखेर पर्यंत हा चारा पुरेल अशी माहिती इगतपुरीचे तालुका पशुसंवर्धन अधिकारी डॉ. प्रदीप कागणे यांनी दिली.इगतपुरी तालुक्यातील जनावरांना एका दिवसाला किमान ३ लाख ८६ हजार लिटर पाणी लागते. जनतेलाच पाणी नसल्याने चारा आणि पाण्यामुळे हतबल झालेल्या शेतकºयांनी घोटीच्या बाजार समितीत जनावरांची मातीमोल भावात विक्र ी सुरू केल्याचेही समोर आले आहे. दुधाच्या एकंदर उत्पन्नापैकी ४० टक्के दूध उत्पादन घटले आहे. तीव्र उन्हाळा, पाणी, चारा आदींमुळे जनावरे रोगग्रस्त होत असूनही तालुक्यातील १४ पशुवैद्यकीय केंद्रांतील पशु वैद्यकीय अधिकारी दुसरीकडे उपचारासाठी गेल्याच्या नावाखाली गायब राहत असल्याची लोकांची तक्र ार आहे.इगतपुरी तालुक्यात ८२ हजार टन चारा अजून ४ महिने पुरेल. इतर तालुक्याला सुद्धा इगतपुरीतुन चारा पाठवता येईल. ह्या तालुक्यात चाराटंचाई अजिबात नाही. टंचाई वाटत असेल तर महसूल विभाग योग्य कार्यवाही करील.- डॉ. प्रदीप कागणे, तालुका पशुसंवर्धन अधिकारी, इगतपुरीतीव्र स्वरूपाची दाहक पाणी टंचाई आणि चाºयाची भयानक टंचाई असतानाही पशुसंवर्धन विभाग लोकांच्या जखमेवर मीठ चोळत आहे. १५ दिवस चारा पुरेल अशी स्थिती नसतांना ४ महिने पुरेल असे सांगतांना काही वाटत नाही. कार्यालयात बसून आकडेवारी काढून इगतपुरी तालुक्याला मूर्ख बनवले जात असेल तर तीव्र आंदोलन करावे लागेल.- लकी जाधव, प्रदेश नेत,े आदिवासी विकास परिषद.चारा पाण्यामुळे जनावरे अखेरचा श्वास घेतांना दिसतात. अत्यल्प किमतीत जनावरे विकायला काढली जात आहेत. शेतकºयाला पाणी नसल्याने तो आधीच त्रस्त आहे. जनावरांना चारा-पाणी कोठून आणावे, याची भ्रांत आहे. प्रशासनाने तातडीने उपाययोजना करावी.- दादा घाडगे, शेतकरी, पिंपळगाव घाडगा.