शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
3
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
4
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
5
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
6
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
7
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
8
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
9
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
10
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
11
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
12
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
13
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
14
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
15
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
16
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
17
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
18
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
19
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
20
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट

अनिल कदम यांचे निफाड तालुक्यावर पुन्हा वर्चस्व

By admin | Updated: October 20, 2014 00:15 IST

अनिल कदम यांचे निफाड तालुक्यावर पुन्हा वर्चस्व

लासलगाव : निफाड मतदारसंघात अनिल कदम सलग दुसऱ्यांदा निवडून आले आहे. कदम यांनी मतदारांशी संपर्क व विकासाला प्राधान्य दिले आहे. त्यामुळेच त्यांना मतदारांनी त्यांच्या बाजूने कौल दिला आहे. अत्यंत अटीतटीच्या झालेल्या राजकीय रणसंग्रामात शिवसेनेचे उमेदवार अनिल कदम यांनी पुन्हा एकदा विजयश्री खेचून आणत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रतिस्पर्धी उमेदवार दिलीप बनकर यांच्यावर ३९२१ अशा मताधिक्याने मात केली आहे. येथे शिवसेना व राष्ट्रवादी यांच्यात थेट लढत पहावयास मिळाली आहे. राज्यात सर्वत्र मोदी लाटेने राजकीय त्सुनामी लाटेचा कुठलाच प्रभाव निफाडमध्ये जाणवला नसल्याचे भाजपाचे उमेदवार वैकुंठ पाटील यांना मिळालेल्या मतांवरून स्पष्ट झाले आहे. वैकुंठ पाटील यांना १८ हजार २१ मते मिळाली तर काँग्रेसही प्रभावहीन झाल्याचे दिसून आले आहे. काँग्रेसचे उमेदवार राजेंद्र मोगल यांना अवघे पाच हजार ८७१ मते मिळाली, तर मनसेचे अस्तित्वच या निवडणुकीत जाणवले नाही. मनसेचे सुभाष होळकर यांना केवळ एक हजार ३६० इतकी कमी मते मिळाली. यंदा गेल्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत सुमारे आठ टक्के मतदान जास्त झाले. त्यामुळे हे वाढीव मतदान कुणाच्या पथ्यावर पडते याकडे संपूर्ण मतदारसंघाचे लक्ष लागले होते.मतमोजणीच्या एकूण १९ फेऱ्या झाल्या. पहिल्या फेरीपासूनच कदम-बनकर यांच्यात चुरशीची लढाई दिसून आली. दहाव्या फेरीपर्यंत बनकर आघाडीवर होते. मात्र अकराव्या फेरीपासून कदम यांनी जोरदार आघाडी घेतली. ती शेवटच्या फेरीपर्यंत कायम होती. अखेर शेवटच्या फेरीमध्ये अनिल कदम यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार दिलीप बनकर यांच्यावर तीन हजार ९२१च्या मताधिक्याने मात करत पुन्हा एकदा निफाड मतदारसंघावर शिवसेनेचा भगवा फडकाविला. मुख्य निवडणूक अधिकारी शशिकांत मंगरुळे व सहायक निवडणूक अधिकारी डॉ. संदीप अहेर यांनी निकाल जाहीर केला. त्यानंतर शिवसैनिकांसह कदम समर्थकांनी मतमोजणी केंद्राबाहेर एकाच जल्लोष साजरा केला. यावेळी निफाड, पिंपळगाव, ओझर शहरात शिवसेनेचे अनिल कदम यांची विजयी मिरवणूक काढण्यात आली. यावेळी माजी आमदार मंदाकिनी कदम, ज्येष्ठ नेते प्रल्हाद पाटील कराड, यतिन कदम, राजेंद्र डोखळे, उत्तम गडाख, सुधीर कराड, मुकुंद होळकर, जावेद शेख, वाल्मीक कापसे, बापू कुंदे, संजय कुंदे यांसह कदम समर्थक उपस्थित होते. (वार्ताहर)