शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
2
"तो काहीच खात नाही, सुन्न झालाय"; अहमदाबाद घटनेचा व्हिडीओ काढणाऱ्या मुलाला बसलाय धक्का!
3
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
4
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक
5
नशिबाचा खेळ! केदारनाथ हेलिकॉप्टर अपघातात आई-वडील, चिमुकलीचा मृत्यू; मुलगा वाचला
6
सोने-चांदी किंवा शेअर नाही तर गुंतवणूकदारांची 'या' पर्यायाला पसंती; मार्केटमध्ये नवा 'ट्रेंड'?
7
सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशाला लागणार मुहूर्त; पदाधिकाऱ्यांचा विरोध मावळला
8
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 
9
बाबांसोबत खेळणाऱ्या 'या' चिमुरड्याला ओळखलंत का? आज करतोय क्रिकेटविश्वावर राज्य
10
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
11
मैत्रीला धोका? ७३% मित्र पैसेच परत करत नाहीत; तुम्हीही 'या' चुकीला बळी पडलाय का?
12
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
13
Mumbai: मुंब्रा दुर्घटनेची माहिती असल्यास रेल्वेला कळवा, प्रशासनाचे नागरिकांना आवाहन!
14
सोमनाथसोबत खरंच लग्न केलं? अखेर राजेश्वरी खरातचा मोठा खुलासा, म्हणाली- "लवकरच मी गुड न्यूज.."
15
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
16
दिवसा काम, रात्री अभ्यास! मोबाईल कव्हर विकणारा रोहित होणार डॉक्टर; NEETमध्ये रचला इतिहास
17
काव्या मारनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर संगीतकार रविचंदरने सोडलं मौन; म्हणाला, "लग्न...?"
18
'फादर्स डे': विराट कोहलीसाठी लेक वामिकाने बनवलं खास ग्रिटींग कार्ड, लिहिलाय खास संदेश
19
परिसरात किती पाणी भरलंय? लगेच कळणार; शहरात रडार लेव्हल ट्रान्समीटर बसवले!

पिंपळगावी संतप्त महिलांचा ग्रामपंचायत सदस्यांना घेराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2021 17:02 IST

पिंपळगाव बसवंत (नाशिक) : कोणत्याना कोणत्या कारणामुळे सतत वादाच्या भोवऱ्यात सापडणाऱ्या म्हसोबा चौकात असलेल्या रेशन धान्य दुकान क्रमांक ४च्या मनमानी कारभाराच्या विरोधात रेशन धान्यधारक महिला आक्रमक झाल्या असून त्यांनी थेट आपला मोर्चा ग्रामपंचायत कार्यालयावर नेऊन ग्रामसदस्यांनाच घेराव घालत रेशन दुकानदारावर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे .

ठळक मुद्देकारवाईची मागणी : रेशन धान्य दुकानाच्या विरोधात आक्रमक

पिंपळगाव बसवंत (नाशिक) : कोणत्याना कोणत्या कारणामुळे सतत वादाच्या भोवऱ्यात सापडणाऱ्या म्हसोबा चौकात असलेल्या रेशन धान्य दुकान क्रमांक ४च्या मनमानी कारभाराच्या विरोधात रेशन धान्यधारक महिला आक्रमक झाल्या असून त्यांनी थेट आपला मोर्चा ग्रामपंचायत कार्यालयावर नेऊन ग्रामसदस्यांनाच घेराव घालत रेशन दुकानदारावर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे .शहरातील म्हसोबा चौकातील तीन नंबरचे दुकानदार हे सतच रेशन धान्य वाटप करताना रेशन घेणाऱ्या लाभार्थ्यांना अरेरावी करत गरिबीची थटा करत असतात. रेशन धान्य दुकानात धान्याचा भ्रष्टाचारही मोठ्या प्रमाणात करत आहे. शासनाने नेमून दिलेल्या वेळेत रेशन धान्य दुकानदेखील उघडत नसल्याने कोरोनाच्या या महामारीत व लॉकडाऊनच्या काळात असंख्य लाभार्थ्यांना रेशन घेण्यासाठी रांगा लावून ताटकळत उभे राहावे लागते आणि रेशन धान्य दुकानदार आपल्या सोयीने ११ वाजता दुकान उघडून आपली मनमानी करत आहे.त्यामुळे या रेशन धान्य दुकानदारांची चौकशी करून व लाभार्थ्यांचे होणारे अपमान बंद व्हावे यासाठी महिलांनी मंगळवार, दि.१५ रोजी एकत्र येत मुजोर दुकानमालकांवर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे. यासाठी कार्डधारक लखन गांगुर्डे, लीलाबाई वाघ, जुलैखा राहिम, शीला चौधरी, माया पवार, संगीता दुधाळे, इमाम पिंजारी, लता वायकांडे, शुभांगी आहेर, छाया वाघ, मोहिनी पगारे, पायल आहेर, आदिनी ग्रामपंचायत कार्यालय गाठून ग्रामपंचायत प्रशासनाकडे तक्रार केली आहे व तातडीने योग्य कारवाई केली जाईल, असे आश्वासन ग्रामपंचायत प्रशासनाने दिले आहे.वेळोवेळी तक्रार असूनही कारवाई नाही..?परिसरातील रेशन धान्य दुकान नंबर ४ संदर्भात अनेक वेळोवेळी लेखी व तोंडी तक्रार देऊनही कारवाई करण्याची हिंमत कोणत्याच अधिकारी वर्गाने केली नसल्याचा आरोप कार्डधारकांनी केला आहे ..!

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतtalukaतालुका