शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

संतप्त महिलांनी अडविली घंटागाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2019 00:38 IST

सामनगावरोड शासकीय तंत्रनिकेतन शेजारील घरकुल योजना इमारतीमध्ये घंटागाडी केरकचरा संकलित करण्यासाठी येत नसल्याने संतप्त महिला रहिवाशांनी शुक्रवारी दुपारी घंटागाडी अडवून मनपा प्रशासनाचा निषेध केला.

नाशिकरोड : सामनगावरोड शासकीय तंत्रनिकेतन शेजारील घरकुल योजना इमारतीमध्ये घंटागाडी केरकचरा संकलित करण्यासाठी येत नसल्याने संतप्त महिला रहिवाशांनी शुक्रवारी दुपारी घंटागाडी अडवून मनपा प्रशासनाचा निषेध केला.प्रभाग १९ मधील सामनगांवरोड येथील घरकुल योजनेच्या इमारतीत गेल्या काही दिवसांपासून घंटागाडी केरकचरा संकलित करण्यास येत नसल्याने रहिवाशांची मोठी गैरसोय झाली आहे. घरकुल योजना इमारतीतील घरे अगोदरच अत्यंत छोटी असल्याने रहिवाशांना विविध अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. त्यात दैनंदिन घरातील केरकचरा कुठे साठवून ठेवायचा हा प्रश्न निर्माण झाला आहे. उघड्यावर मोकळ्या जागेच केरकचरा टाकला तर मनपा आरोग्य विभागाकडून आर्थिक दंडात्मक कारवाई करण्यात येते. ओला-सुका कचरा वर्गीकरण करावा लागतो. ओला कचरा कुजत असल्याने मोठी दुर्गंधी पसरते. त्यात घंटागाडी नियमीत येत नसल्याने रहिवासी व विशेष करून महिलांची मोठी गैरसोय होत आहे. यामुळे संतप्त झालेल्या महिला रहिवाशांनी शुक्रवारी दुपारी घरकुल इमारत आवारात आलेली घंटागाडी रोखुन धरली होती. केरकचऱ्याने भरलेले डस्टबीन घंटागाडीपुढे ठेवत हा कचरा कुठे टाकायचा असा प्रश्न विचारत घंटागाडीवरील कर्मचाऱ्यांना महिलांनी जाब विचारला. शेवटी घंटागाडी चालकांने दररोज नियमितपणे वेळेवर येण्याचे आश्वासन दिल्यानंतर संतप्त महिलांनी घंटागाडी सोडली. दरम्यान महिलांच्या आंदोलनावेळी प्रभाग समितीची सभा सुरू असल्याने त्याचे पडसाद सभेत उमटले.

टॅग्स :WomenमहिलाNashik municipal corporationनाशिक महानगर पालिका