शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

नाराज उमेदवार, अपक्षांचे होणार पॅनल

By admin | Updated: February 7, 2017 22:54 IST

नाराज उमेदवार, अपक्षांचे होणार पॅनल

नाशिकरोड : मनपा निवडणुकीत पक्षाने उमेदवारी नाकारलेले नाराज, अपक्ष व काही पक्षांचे उमेदवार असे सर्वजण मिळून पॅनल बनवून निवडणूक लढविण्याच्या तयारीला लागले आहेत, तर पक्षाचे पदाधिकारी व उमेदवार आपल्या पक्षातील नाराजांना राजी करण्यासाठी प्रयत्न करत आहे.  मनपा निवडणुकीत शिवसेना, भाजपाकडे इच्छुकांची मोठी भाऊगर्दी झाल्याने तेथेच नाराज झालेल्यांची संख्या मोठी आहे, तर कॉँग्रेस, राष्ट्रवादी व मनसेकडे उमेदवारी मिळविण्यासाठी इच्छुकांमध्ये काही चुरस नव्हती. उलट काही प्रभागांतील काही गटात उमेदवारच नाही मिळाल्याने त्या ठिकाणी त्यांचे पॅनल होऊ शकले नाही. भाजपा, शिवसेनेकडून दावेदार असलेले मात्र त्यांना उमेदवारी न मिळाल्याने काहीजणांनी ऐनवेळी दुसऱ्या पक्षाचा एबी फॉर्म घेऊन अधिकृत उमेदवार झाले आहेत. मात्र बहुतांश इच्छुक आपली नाराजी शब्दातून अत्यंत प्रखरपणे सार्वजनिक ठिकाणी व्यक्त करत आहे. त्यातील काहीजण बंडखोरी न करता उमेदवारी अर्ज मागे घेतील असे चित्र दिसत आहे. मात्र उमेदवारी न मिळालेले काहीजण कुठल्याही परिस्थितीत निवडणूक लढवायची या भूमिकेत आहेत ते अपक्ष जेथे पक्षाच्या उमेदवारांचे पॅनल पूर्ण नाही त्या पक्षाच्या उमेदवारांना सोबत घेऊन पॅनल करून निवडणूक लढविण्याचे नियोजन केले जात आहे. जेलरोड प्रभाग १८ मध्ये जनसुराज्य शक्ती पक्ष, मनसे, अपक्ष असे चार उमेदवारांचे पॅनल जवळपास झाले आहे, तर प्रभाग १७ मध्ये रिपाइं आठवले गट व भाजपाची उमेदवारी न मिळालेले नाराज अशा दोघांचे पॅनल आजमितीला निश्चित झाले आहे.