म्हाळसाकोरे : तांगा शर्यत बंदीच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर ग्रामीण भागातील हौशीशौकिनांत मात्र नाराजीचे वातावरण पसरले आहे. ग्रामीण भागात खिल्लारी गोºहा, ताकदीवान घोडा व तांग्याचे वैभव हे ज्यांच्या दारी उभे त्यांचा रुबाब वेगळाच असतो. हे वैभव जोपासण्यासाठी होणारी पदरमोड व हौशीसाठी खुराक व औषधपाणी करूनही काही फायदा होत नसल्याने काहीसे नाराज आहे. शर्यती व प्रत्यक्षात पाठीवर होणारे अत्याचार व प्राणिमित्रांनी केलेले दावे या निकालाने खरे ठरले व केवळ गुलालाचा मान व देणगीच्या रकमेपेक्षा नावाची किंमत किंबहुना गावाच्या नावावर चालणारा हा खेळ बंद पडला आहे. या बंदीबाबत ग्रामस्थ नाराजी व्यक्त करीत आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या बंदीमुळे नाराजी
By admin | Updated: May 13, 2014 00:20 IST