शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

मतदार यादीतून नाव गहाळ झाल्याने सहकारनगर भागातील नागरिकांचा संताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2019 19:39 IST

Maharashtra Election 2019सहकारनगर भागातील अनेक मतदारांची आरपी विद्यालयातील मतदान केंद्रावर येऊन निराशा झाली. मतदार यादीत नावच नसल्याने अनेक नागरिकांना मतदान करता आले नाही. या भागातील काही कुटुंबांची नावे मतदार यादीतून गहाळ असल्याचे दिसून आले.

ठळक मुद्देमतदार यादीत नावाची शोधाशोधनाव गहाळ झाल्याने नागरिकांमध्ये संताप

नाशिक : शहरातील नाशिक पूर्व मतदारसंघातील सहकारनगर परिसरात अनेक मतदारांची नावे मतदार यादीत नसल्याने या भागातील नागरिकांनी संताप व्यक्त केला. विशेष म्हणजे गेल्या लोकसभा निवडणुकीत या सर्वांनी मतदान केले असतानाही या विधानसभा निवडणुकीत मतदान करता न आल्याने या मतदारांनी नाराजी व्यक्त केली आहे. सहकारनगर भागातील अनेक मतदारांची आरपी विद्यालयातील मतदान केंद्रावर येऊन निराशा झाली. मतदार यादीत नावच नसल्याने अनेक नागरिकांना मतदान करता आले नाही. या भागातील काही कुटुंबांची नावे मतदार यादीतून गहाळ असल्याचे दिसून आले. अशा प्रकरणांमध्ये विविध पक्षांच्या बूथवरील कार्यकर्त्यांनी मोबाइल अ‍ॅप आणि लॅपटॉपच्या माध्यमातून निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर नाव शोधण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे काही मतदारांना दिलासा मिळाला असला तरी अनेकांना निराश होऊन घरी परतावे लागल्याने अशा मतदारांंनी संताप व्यक्त केला आहे. कोट- सकाळपासून सर्व बूथवरील मतदार याद्या पाहून झाल्या. शिवाय मोबाइल अ‍ॅपसोबतच निवडणूक आयोगाच्या संके तस्थळावरही नाव शोधले. मात्र मतदार यादीत नाव न मिळाल्याने मतदान करता आले नाही. लोकसभा निवडणुकीत याच भागात नाव होते. असे असताना मतदार यादीतून नाव कसे गहाळ होऊ शकते. - विशाल बाफणा, नागरिक 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019nashik-east-acनाशिक पूर्वVotingमतदान