शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना जागृती प्रतिबंधासाठी लढलेल्या अंगणवाडी सेविकेचा कोरोनामुळेच मृत्यु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2020 18:05 IST

सायखेडा : कोरोना महामारीमुळे लॉकडाऊन काळापासुन आपल्या नित्य कामकाजात कोणताही खंड न पाडता जनजागृती कोरोना प्रतिबंधासाठी रानोमाळ हिंडणाऱ्या कर्तव्यतत्पर अंगणवाडी सेविकेचा कोरोनामुळेच मृत्यु झाल्याने निफाड तालुक्यातील खेरवाडी गाव हळहळले आहे.

ठळक मुद्देआणखी काही अंगणवाडी सेविकांना कारोनाची लागण झाल्याचे समजते

सायखेडा : कोरोना महामारीमुळे लॉकडाऊन काळापासुन आपल्या नित्य कामकाजात कोणताही खंड न पाडता जनजागृती कोरोना प्रतिबंधासाठी रानोमाळ हिंडणाऱ्या कर्तव्यतत्पर अंगणवाडी सेविकेचा कोरोनामुळेच मृत्यु झाल्याने निफाड तालुक्यातील खेरवाडी गाव हळहळले आहे.अलका केशव संगमनेरे (५१) यांनी सतरा वर्षापुर्वी अंगणवाडी सेविका म्हणुन सेवेस सुरु वात केली. कुटुंबीयांना हातभार लावत आपले कर्तव्यदेखील इमाने इतबारे करण्यात त्यांची ख्याती होती. कोरोना काळात गेल्या काही महीन्यापासून शासनाच्या आदेशाने करोना परिस्थिती सांभाळण्यासाठी डॉक्टरासमवेत आपल्या आरोग्याची पर्वा न करता गावाची सेवा करत होत्या. दिलेली प्रत्येक जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडत रानोमाळ हिंडत सामान्य जनतेला कोरोनाबाबत प्रबोधन अन प्रतिबंधासाठी अर्सेनिक अल्बम गोळ्या वितरण तसेच रु ग्णांचे सर्वेक्षण अशी दिलेली प्रत्येक जबाबदारी संगमनेरे यांनी पेलली होती. जनतेच्या आरोग्यासाठी अविरत लडणाºया अंगणवाडी सेविकेचा दहा तारखेला कोरोना पॉझीटिव्ह अहवाल आला अन उपचारादरम्यान त्यांचा तेरा आॅगस्टला मृत्यु झाला.दरम्यान खेरवाडी तालुका निफाड येथे आणखी काही अंगणवाडी सेविकांना कारोनाची लागण झाल्याचे समजते गेल्या मार्च महिन्यापासून निफाड तालुक्यामध्ये अंगणवाडी सेविका, आशा तसेच सरकारी दवाखान्यातील कर्मचारी कारोनाचा मुकाबला करण्यासाठी प्रत्येक गावातील वाडी, वस्ती पिंजून काढत आहे. गावाच्या वेशीवरच कोरोनाला रोखण्यासाठी प्राप्त परिस्थिती ती झगडा देत आहे. कोरोनाशी दोन हात करताना मृत्यू झालेल्या अलका संगमनेर त्यांचे पश्चात पती, दिर असा परिवार आहे.(फोटो १६ अलका संगमनेरे)

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याDeathमृत्यू