शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

अंगणवाडीसेविका भरतीला वयाच्या अटीमुळे खो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 01:44 IST

अंगणवाडी सेविका, मदतनीस, मिनी अंगणवाडी सेविका यांच्या  भरती प्रक्रियेतील वयोमर्यादेची अट २१ ते ३० ऐवजी २१ ते ४० करण्यात यावी, अशी मागणी महिला व बालकल्याण सभापती अश्विनी अनिल आहेर यांनी राज्याच्या महिला व बालकल्याणमंत्री यशोमती ठाकूर यांच्याकडे  केली आहे.    

ठळक मुद्देवय वाढवा : सभापतींचे महिला बालकल्याणमंत्र्यांना साकडे

नाशिक : अंगणवाडी सेविका, मदतनीस, मिनी अंगणवाडी सेविका यांच्या  भरती प्रक्रियेतील वयोमर्यादेची अट २१ ते ३० ऐवजी २१ ते ४० करण्यात यावी, अशी मागणी महिला व बालकल्याण सभापती अश्विनी अनिल आहेर यांनी राज्याच्या महिला व बालकल्याणमंत्री यशोमती ठाकूर यांच्याकडे  केली आहे.    यासंदर्भात दिलेल्या निवेदनात आहेर यांनी म्हटले आहे की, शासन निर्णयानुसार अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस यांच्या नियुक्तीच्या अटी व शर्ती देण्यात आलेल्या आहेत. सदर आदेशात अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस पदावर सरळसेवा नियुक्तीसाठी वयोमर्यादा २१ ते ३० वर्षे अशी आहे. नाशिक जिल्ह्यात अंगणवाडी सेविका २४१ मदतनीस ९६४ मिनी अंगणवाडी सेविका २३ असे एकूण १२२८ पदे रिक्त आहेत.जिल्ह्यात ही पदे भरण्याची प्रक्रिया प्रस्तावित आहे. सदर भरती प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी सरळसेवा नियुक्तीच्या वयोमर्यादेमध्ये वाढ करावी व शासन निर्णयात सुधारणा करावी, अशी मागणी अश्विनी आहेर यांनी केली आहे. मंत्री महोदयांना त्यांनी या सर्व मागण्यांचे निवेदन सादर केले आहे. आदिवासी ग्रामीण भागात अनेक विधवा, परितक्त्या महिलांचे वयोमान ३० वर्षांपेक्षा जास्त असल्याचे आढळून आलेले आहे. ३० वर्षे वयोमर्यादेच्या अटी-शर्तीमुळे स्थानिक महिला सरळेसवा भरतीच्या वेळी अपात्र होतात व नोकरीच्या संधीपासून वंचित राहतात. त्यामुळे भरतीत त्यांच्या वयोमर्यादेत वाढ करण्यात यावी, अशी ग्रामीण भागातील विधवा, परित्यक्ता महिलांची मागणी आहे.

टॅग्स :nashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषदYashomati Thakurयशोमती ठाकूर