शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

अंगणवाडी सेविकांचा पंचायत समितीसमोर ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2019 17:32 IST

सटाणा : विविध मागण्यांसाठी आंदोलन

ठळक मुद्देअंगणवाडी कर्मचा-यांचे प्रश्न व विविध मागण्यांसाठी दि. २५ फेब्रुवारी रोजी ठाणे ते मंत्रालयपर्यंत मशाल मोर्चा काढण्यात येणार असल्याचेही राजेश सिंग यांनी संगितले.

सटाणा : बागलाण तालुक्यातील अंगणवाडी सेविकांना अमृतआहार योजनेचे थकीत पैसे त्वरित मिळावेत तसेच मोदी सरकारने गेल्या वर्षी सेविकांना १५०० रु पये आणि मदतनीस यांना ७५० रु पये देण्यात येतील, अशी घोषणा केली होती. त्याची अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी बागलाण तालुक्यातील अंगणवाडी सेविकांनी पंचायत समिती येथे ठिय्या आंदोलन छेडले.संघटनेचे राज्य सचिव राजेश सिंग व भगवान दौणे, तालुकाध्यक्ष रजनी कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी (दि.१६) पंचायत समिती कार्यालयासमोर विविध मागण्यांसाठी ठिय्या आंदोलन करण्यात आले. अमृतआहार योजनेचे थकीत पैसे मिळत नाही तो पर्यंत अंगणवाडी मध्ये अमृतआहारचे काम न करण्याचा निर्धार अंगणवाडी सेविकांनी केला. यावेळी सचिव राजेश सिंग यांनी संगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या आॅक्टोबर मध्ये अंगणवाडी सेविकांच्या मानधनात दुपटीने वाढ केली होती. ही मानधन वाढ नोव्हेंबरमध्ये मिळणे अपेक्षित होते. मात्र राज्य सरकारने अद्यापही अंगणवाडी सेविकांना मानधन वाढवून दिलेले नाही. केंद्राचे आदेश असतानाही राज्य सरकार याची अंमलबजावणी करत नाही. केंद्र सरकार आणि राज्य सरकारने अंगणवाडी सेविकांची दिशाभूल त्वरित थांबवावी, आॅक्टोबर २०१७ पासून एप्रिल २०१८ पर्यंत देण्यात आलेल्या मानधनवाढीच्या फरकाची रक्कम देण्यात यावी. नोव्हेंबर २०१७ पासून जानेवारी २०१९ पर्यंत अमृत आहार योजनेसाठी खर्च झालेले पैसे त्वरित देण्यात यावे. बचतगटांचे थकीत पैसे देण्यात यावे. सेवा समाप्त करण्यात आलेल्या अंगणवाडी कर्मचाना सेवा समाप्तीचा लाभ देण्यात यावा, आदी मागण्या असल्याचे सांगण्यात आले. ठाणे ते मंत्रालय मशाल मोर्चागेल्या १५ महिन्यांपासून अंगणवाडी कर्मचाऱ्यांना अमृत आहार योजनेचे पैसे दिले गेले नाहीत. अमृत आहार योजनेचे मिळत नाही तोपर्यंत बागलाण तालुक्यात योजनेचा आहार शिजवणार नाही, असेही राजेश सिंग यांनी संगितले. अंगणवाडी कर्मचा-यांचे प्रश्न व विविध मागण्यांसाठी दि. २५ फेब्रुवारी रोजी ठाणे ते मंत्रालयपर्यंत मशाल मोर्चा काढण्यात येणार असल्याचेही राजेश सिंग यांनी संगितले.

टॅग्स :Nashikनाशिक