शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

अंगणवाडी सेविका, मदतनीस भरतीचा मार्ग मोकळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2020 20:03 IST

नाशिक जिल्ह्यात ४७७६ अंगणवाड्या असून, मिनी अंगणवाड्यांची संख्या ५०६ इतकी आहे. काही वर्षांपूर्वी या अंगणवाड्यांच्या व्यवस्थापनाशी संबंधित प्रत्येक मोठ्या अंगणवाड्यांना एक सेविका व एक मदतनीसांची नेमणूक देण्यात आली तर मिनी अंगणवाडीला

ठळक मुद्देजिल्ह्यात साडेसातशे पदे रिक्त : दोन वर्षांपासून होती स्थगिती

लोकमत न्युज नेटवर्कनाशिक : एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंतर्गत कार्यरत असलेल्या राज्यातील अंगणवाड्यांसाठी अंगणवाडी सेविका व मदतनीस भरतीवर असलेली स्थगिती उठविण्यात आली असून, महिला व बाल विकास विभागाने एकूण रिक्त पदांच्या ५० टक्के पदे तत्काळ भरण्यास अनुमती दिली आहे. शासनाच्या या निर्णयाने अंगणवाड्यांतील रिक्त पदे भरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. नाशिक जिल्ह्यात सुमारे साडेसातशे पदे रिक्त आहेत.

नाशिक जिल्ह्यात ४७७६ अंगणवाड्या असून, मिनी अंगणवाड्यांची संख्या ५०६ इतकी आहे. काही वर्षांपूर्वी या अंगणवाड्यांच्या व्यवस्थापनाशी संबंधित प्रत्येक मोठ्या अंगणवाड्यांना एक सेविका व एक मदतनीसांची नेमणूक देण्यात आली तर मिनी अंगणवाडीला फक्त एकच अंगणवाडी सेविकांची नेमणूक करण्याचे शासनाचे आदेश आहेत. मात्र गेल्या काही वर्षांपासून वाढत्या लोकसंख्येचा विचार करता ग्रामीण भागात अंगणवाड्यांमध्ये येणाऱ्या बालकांची संख्या वाढली, त्यामानाने अंगणवाडी सेविकांची संख्या अपुरी पडत असतानाच शासनाने सन २०१७ मध्ये अंगणवाड्यांची सुधारित संख्या निश्चित होईपर्यंत त्याचबरोबर अल्प उपस्थिती असलेल्या अंगणवाड्यांची एकत्रितीकरण करण्यासाठी अंगणवाडी सेविका व मदतनीसांची पदे भरण्यास स्थगिती दिली होती. शासनाच्या या आदेशाविरुद्ध राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाने मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली असून, त्यावर सुनावणी सुरू आहे. मात्र राज्य शासनाच्याच शक्ती प्रदान कार्यक्रमांतर्गत एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंतर्गत राज्यात अंगणवाडी सेविकांची रिक्त पदे भरली जावीत अशी वारंवार मागणी करण्यात आल्याने राज्याच्या मुख्य सचिवांनी यासंदर्भात आदिवासी जिल्ह्यांमध्ये अंगणवाडी भरतीवरील स्थगिती उठविण्याचा निर्णय घेतला. संपूर्ण आदिवासी जिल्ह्यात रिक्त असलेली सर्व पदे भरण्यास मंजुरी देण्यात आली आहे तर अन्य भागातील रिक्त असलेल्या एकूण पदांच्या ५० टक्के पदे भरण्यास मुभा देण्याचा निर्णय महिला व बाल विकास विभागाने घेतला आहे.

टॅग्स :Governmentसरकारzpजिल्हा परिषदnashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषद